Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’इरसाल नमुने’ विनोदी पुस्तक वाचकप्रिय होईल ः डॉ. सुधीर तांबे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः प्रा. दिलीप सोनवणे ह शांत,सद्गुणी व्यक्तिमत्व असून साहित्य क्षेत्रात त्यांनी संगमनेरचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी शब्दबद्ध

गावठी कट्टा बाळगणार्‍या तरुणास ; शेंडी बायपास येथे शिताफीने अटक
कोपरगाव शहरातील विदयुत पुरवठा सुरळीत करा,अन्यथा आंदोलन उभारू- पाठक

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः प्रा. दिलीप सोनवणे ह शांत,सद्गुणी व्यक्तिमत्व असून साहित्य क्षेत्रात त्यांनी संगमनेरचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली ग्रामीण विनोदी ’इरसाल नमुने ’ह पुस्तक वाचकप्रिय होईल असे विचार माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. संगमनेर येथील ग्रेप्स सभागृहात प्रा. दिलीप सोनवणे यांनी लिहिलेल्या ’इरसाल नमुने ’या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि स्व. सुखदेव पांडुरंग सोनवणे यांची 90वी जयंतीनिमित्त मान्यवर प्रबोधक व्याख्याने, सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधीर तांबे बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील अ‍ॅड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.यावेळी व्यासपीठावर शिवव्याख्याते प्रा. एस. झेड देशमुख, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,प्रस्तावनाकार वआसरा प्रकाशनचे डॉ. शिवाजी काळे, विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, मा नगरसेवक कैलास वाकचौरे, प्रा. शिवाजीराव बारगळ,अप्पासाहेब जोर्वेकर,जेष्ठ समाजसेवक रमेशशेठ जोर्वेकर,संकेत सोनवणे, दिलीप वाकचौरे, प्रा.दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते, या सर्वांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.सर्व मान्यवर पाहुण्यांनी मनोगते व्यक्त केली. श्रीस्वरस्वतीमाता व स्व.सुखदेव सोनवणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अनेक मान्यवरांचा, उपस्थितांचा सोनवणेपरिवाराने बुके शाली, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार केले.प्रतापराव सोनवणे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली तर सौ. प्राजक्ता सोनवणे यांनी अनुमोदन दिले.अड, आहेर संतोषशेठ जोर्वेकर, रंगनाथ जोर्वेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.मा. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सोनवणे, जोर्वेकर परिवाराचे कौतुक केले.प्रा. एस.झेड. देशमुख यांनी परंपरा आणि संस्कृती जतन करणे,चांगली माणसे व पुस्तके समजून घेतली पाहिजे.सावित्रीबाई फुले यांनी ’काव्यफुले ’कवितासंग्रहात श्रीस्वरस्वतीदेवीचे महत्व लक्षात घेतले आहे, भूतकालीन संदर्भ न पुसता नव्या पिढीला चांगले ते सांगणे हाच आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले. शिवराय इतिहास सांगितला. प्राचार्य टी.ई. शेळक यांनी अध्यक्षीय भाषनातून स्व. भाऊसाहेब थोरात, स्व. अड, रावसाहेब शिंदे यांच्या आठवणी सांगत असे साहित्यिक अभ्यासले पाहिजे त्याच जाणिवेने प्रा. दिलीप सोनवणे यांचे व्यक्तित्व, साहित्य समजून घ्यावे असे आवाहन केले.यावेळी सोमनाथ जोर्वेकर, सुभाष जोर्वेकर, बबनराव गोरे, मारुतीशेठ जोर्वेकर, अनिल सुरग, भागवत बंधू, सिंधुमाई सोनवणे, सौ. छाया सोनवणे आदिंनी कार्यक्रमात भाग घेतला. सूत्रसंचालन दिलीप वाकचौरे यांनी केले तर अरविंद सोनवणे यांनी आभार मानले.

COMMENTS