Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहराचे नामांतर ला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली

जेवढ्या घाई गडबडीने आपण नावे बदलेली त्याच गतीने पूर्ववत करावे एस टी महामंडळ यांना निवेदन देण्यात आले

बीड प्रतिनिधी - शहरांचे नामांतरण सध्या ऊच्च न्यायालयात सुरू असून उच्च न्यायालयाने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत नावाचे बद्दल करू नये असे आदेश

राज्यात 10 नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार सुरू
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली सद्भावना दिवस शपथ 
महादेव जानकरांचा परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल

बीड प्रतिनिधी – शहरांचे नामांतरण सध्या ऊच्च न्यायालयात सुरू असून उच्च न्यायालयाने जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत नावाचे बद्दल करू नये असे आदेश असतानाही एसटी महामंडळ यांनी नावाचे बद्दल केले नसल्याने नावात बदल करा यासाठी  निवेदन देण्यात आले निवेदन म्हटले आहे की मा. उच्च न्यायालय मुंबई चे उस्मानाबाद तथा औरंगाबाद या शहराचे नामांतर ला स्थगिती दिली आहे. सध्या प्रकरण न्यायालयात असून निकाल लागेपर्यंत याचे नावात कोणताही बदल होणार नाही असे. आदेश सर्व सरकारी व निमसरकारी संस्था/कार्यालय यांना   करण्यात येते की, उल्लेखीत शहरांची नांवे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यावर प्राप्त आक्षेपावर निर्णय होणे बाकी आहे. नावे. बदलेली नसतांना शासकीय व निमशासकीय विभाग बेकायदेशीरपणे नावे बदलून त्याऐवजी धाराशिव व छत्रपती संभाजीनगर हे नाव का वापरात आहेत ? न्यायालयाचे आदेश आहेत की, संपूर्ण निकाल होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कोणीही या शहराच्या मुळ नावात बदल करू नये. म्हणून आपणास विनंती आहे की, बस स्टॅण्ड मधील फलकात आगार (बसेस) मधील मार्ग फलकावरील तसेच आवक जावक नोंद वही वरील जर नावात बदल केला असेल तर त्वरीत त्याला आदेशाप्रमाणे पूर्ववत करावे.  तिकीटे व अनाऊंसमेंट मध्ये सुध्दा मुळ नावाचाच प्रयोग करावा. ज्या-ज्या ठिकाणी आपण बदल केले आहेत त्या त्या ठिकाणी पूर्ववत करावे, म्हणजे धाराशिव नाव न वापरता उस्मानाबादच व छत्रपती संभाजीनगर नाव न वापरता औरंगाबादच याच मुळ नावाचा उल्लेख करावा. जेवढया घाई गडबडीने आपण नावे बदलेली होती त्याच गतीने पूर्ववत करावे . अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला निवेदन द्वारे देण्यात आला निवेदन  देताना मोईज राज माजी नगरसेवक सादिक नजर खान आदि होते.

COMMENTS