कोपरगाव प्रतिनिधी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमधील क्रॉस रस्त्यांच्या खोलीमुळे
कोपरगाव प्रतिनिधी – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमधील क्रॉस रस्त्यांच्या खोलीमुळे पावसाळ्यात पाणी व गाळ साचून आठ-आठ दिवस वाहतुकीची समस्या निर्माण होऊन दळणवळण विस्कळीत होते. शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या विचारात घेऊन बोगद्याखालील रस्त्यांची उंची 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे परजणे यांनी ही मागणी केलेली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा येत्या 11 डिसेंबर 2022 रोजी देशाचे पंतप्रधान सन्मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ना. एकनाजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या 520 कि. मी. पूर्ण झालेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. सदरचे काम पूर्णत्वास येत असल्याचा सर्वांना आनंदच आहे. या महामार्गाने दळणवळणासह वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. तथापि या महामार्गासाठी ज्या-ज्या शेतकर्यांच्या जमिनी सरकारकडून संपादीत करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकर्यांची आज काय अवस्था आहे याचाही विचार आपण करायला हवा ही रास्त अपेक्षा आहे. 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत असताना ज्या शेतकर्यांच्या शेतीचे तुकडे झालेले आहेत, ज्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली आहे, ज्या रस्त्यांची बोगद्याखाली खोली झालेली आहे अशा सर्व रस्त्यांचा गाळ, चिखल काढून उंची वाढविण्याची मागणी परजणे यांनी केली आहे.
COMMENTS