Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत रिक्षा चालकांची वाढली मुजोरी

कल्याण प्रतिनिधी - डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं तसंच लाथाबुक्क्यांनी बेदम

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ
Sangamner : महुसलमंत्री बाळासाहेब थोरात यांची गंगा माता मंदिर ट्रस्टला भेट (Video)
पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं तसंच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. डोंबिवलीच्या इंदिरा चौकातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ रात्री साडे अकरा वाजताची ही घटना आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, अद्याप रिक्षा चालकाला अटक झालेली नाही गणेश तांबे असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. गणेश हा सोमवारी  रात्रीच्या वेळेस रिक्षाने प्रवास करत होता. रात्रीची वेळ असल्याचे कारण देत रिक्षा चालकाने दुप्पट पैसे मागितले. या विरोधात गणेश तांबे याने  रिक्षा चालकाला विचारणा केलीय.याचा राग डोक्यात ठेवून रिक्षा चालकानं तांबे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

COMMENTS