Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकांची पालकमंत्र्यांकडून पहाणी

वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचे वाटप

बीड प्रतिनिधी - राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी,बोरीपिंपळगा

मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड

बीड प्रतिनिधी – राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी,बोरीपिंपळगाव या ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या  शेतपिकांची प्रत्यक्ष पहाणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीची पंचनामे युद्धपातळीवर करुन अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
तसेच बीड तालुक्यातील तिप्पटवाडी तसेच घोसापुरी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. तिप्पटवाडी येथील शेतकरी अनंत नामदेव शेंडगे यांचे व घोसापुरी येथील शेतकरी श्रीहरी कुटे यांचे प्रत्येकी दोन बैल वीज पडून दगावले होते.  या पशुपालकांची प्रत्यक्ष भेट घेत मदतीचे धनादेश या पशुपालकांना पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

COMMENTS