Homeताज्या बातम्यादेश

जोशीमठ मधील जमीन 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचली

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठ परिसरातील जमीन अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे. भारतीय अवकाश संश

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले
आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्याने धान्य वितरण सुरळीत सुरू
जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या जोशीमठ परिसरातील जमीन अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (एनएसआरसी) या इमेजेस प्रसिद्ध केल्या आहेत. यावरून जोशीमठमध्ये जमीन खचण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा अंदाज येतो आहे.
इस्रोने म्हटले आहे की, 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान जोशीमठमध्ये 5.4 सेमी भूस्खलनाची नोंद झाली आहे. त्याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठमध्ये 9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचे दिसून आले होते. एनएसआरसीने गेल्या आठवड्यात सांगितले की, डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यादरम्यान जोशीमठमध्ये वेगाने भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे. सॅटेलाइट इमेजमध्ये दिसतेय की, आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासह मध्य जोशीमठमध्ये सबसिडन्स झोन आहे. जोशीमठ-औली रस्त्यालगत 2,180 मीटर उंचीवर सर्वाधिक भूस्खलन झाले आहे. 2022 मध्ये, एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान, जोशीमठमध्ये 8.9 सेंटीमीटरपर्यंत भूस्खलन झाल्याचे नोंदवण्यात आले होते. जोशीमठमधील भूस्खलनाचे विश्‍लेषण करण्यासाठी अनेक तज्ज्ञांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मात्र, या परिस्थितीसाठी स्थानिक लोकांनी एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे, एनटीपीसीने एक निवेदन जारी करून त्यांचा बोगदा जोशीमठच्या खालून जात नाही, त्यामुळे त्यांचा आणि या परिस्थितीचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

COMMENTS