Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

मुंबई ः पक्षचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर पडला आहे,  सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले

मुंबईतील डान्सबारला पोलिसांचे संरक्षण
नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .
…तर, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार

मुंबई ः पक्षचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर पडला आहे,  सोयाबीनची खरेदी जागतिक बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केली जाऊ नये, असे अपेक्षित आहे. परंतू सोयाबीन असो की, इतर पीकांची खरेदी व्यापार्‍यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने केली जात असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतकर्‍यांचे आर्थिक हित लक्षात घेता यापुढे सोयाबीन पिकांची खरेदी केंद्रे सुरु करुन सरकारने सोयाबीनची हमी भावाने खरेदी करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लोकांसाठी सत्ता आणि संपत्ती सर्वोच्च आहे. ते सत्तेसाठी गेलेले आहेत. यांना काही विचार नाही, आयडॉलॉजी नाही, लोकांचं हित नाही. अधिकाधिक काय मिळवता येईल, हा उद्देश ठेवून ही मंडळी फुटलेली आहेत. चौकशीच्या फेर्‍यातून मुक्ती मिळावी, याच उद्देशाने ते फुटले आहेत. स्वत:चं पाक्षालन करण्यासाठी फुटले आहेत. अशा व्यक्तींकडून काय अपेक्षा ठेवायची ? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. धर्मांध पक्षात जात आहेत. ते अजित पवार यांच्या पक्षात जात असले तरी ते भाजपच्या इशार्‍यावर चालणारे बाहुले आहेत, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कमी खर्चात येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. परंतु गेल्या काही वर्षापासून किडीचा प्रादुर्भाव, निसर्गाचा असमतोलपणा, वाढलेली मजुरी, बी-बियाणे व औषधांचे चढे दर यामुळे सोयाबीन शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यातच किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून देखील सोयाबीनचा हमीभाव अत्यंत कमी ठरविण्यात आला असून व्यापार्‍यांकडून देखील सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही कमी किमतीत केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च देखील भरुन निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरी देखील सरकार गप्प असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

COMMENTS