Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय फलदांजांची पुन्हा उडाली दाणादाण

पुणे : भारतीय फलंदाजांची हाराकिरी पुणे कसोटीतही दिसून आली. पहिल्या बंगळुरू कसोटीत भारत सर्वबाद 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर मोठी नामुष

विरुष्का दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
पै. गणेश जगताप याने माऊली जमदाडे याला गदालोट डावावर केले चितपट
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय

पुणे : भारतीय फलंदाजांची हाराकिरी पुणे कसोटीतही दिसून आली. पहिल्या बंगळुरू कसोटीत भारत सर्वबाद 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यानंतरही भारतीय संघ धडा घेण्यास तयार नसल्याचे पुणे कसोटीत देखील दिसून आले. या कसोटीत मिचेल सँटरनच्या 7 विकेट्सच्या जोरावर किवी संघाने भारताला 156 धावांवर ऑल आऊट केले. अशारितीने भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक फलंदाजी करताना दिसले.
फिरकीसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या फिरकीपटूने आपल्या फिरकीची जादू दाखवली. पहिल्या बंगळुरू कसोटीत टीम इंडिया 46 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे भारताला त्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

COMMENTS