Homeताज्या बातम्यादेश

सरकारला किंमत मोजावी लागेल

खा. शरद पवारांचा इशारा खासदार निलंबनप्रकरणी विरोधकांचा मोर्चा

नवी दिल्ली ः लोकशाहीमध्ये संस्थेला महत्व असते, ज्याचा आपाण मान राखतो. संसदेत जे झाले ते देशाच्या इतिहासात कधीही झालेले नाही. तब्बल 150 खासदारांना

भाजपकडून देशात सत्तेचा गैरवापर ः खा. शरद पवार
राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार
राजीनामा मागे घेण्याचे संकेत ?

नवी दिल्ली ः लोकशाहीमध्ये संस्थेला महत्व असते, ज्याचा आपाण मान राखतो. संसदेत जे झाले ते देशाच्या इतिहासात कधीही झालेले नाही. तब्बल 150 खासदारांना संसदेच्या बाहेर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य संसदेत झाले. चार- पाच दिवसांपूर्वी संसदेत घुसखोरी झाली. याच घुसखोरीसंदर्भात प्रश्‍न विचारले, त्यांना पास कोणी दिले? ते संसदेत कसे आले? यावर चर्चा होणे गरजेचे होते. विरोधकांच्या या प्रश्‍नांचे उत्तर देणे सरकारकडून अपेक्षित होते. मात्र सरकारकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही. याऊलट याची मागणी करणार्‍या खासदारांचे निलंबन करण्यात आले. याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशाराच राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिली आहे.
विरोधक खासदारांनी गुरुवारी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला, यावेळी शरद पवार माध्यमांसोबत बोलत होते. संसदेत सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. भाजप विरोधकांना कोंडीत पकडत आहे. त्याचवेळी विरोधी खासदारांनी गुरुवारी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला. यावेळी काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारने उत्तर द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन याप्रकरणी निवेदन द्यावे.  सभापतींच्या मिमिक्रीवर शरद पवार म्हणाले की, हा सभागृहातील नसून बाहेरचा विषय आहे. दुसरीकडे संसदेच्या सुरक्षेत भंग झाल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ आजही कायम राहू शकतो. या गदारोळामुळे बुधवारी (20 डिसेंबर) आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आतापर्यंत 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी 109 लोकसभेचे आणि 34 राज्यसभेचे आहेत. या खासदारांना संसदेत येण्यास बंदी आहे. कालच्या कामकाजात लोकसभेतील 98 विरोधी खासदार आणि राज्यसभेत 94 खासदार उपस्थित होते. खासदारांना निलंबित करून भाजपला सर्व विधेयके चर्चेविना मंजूर करून घ्यायची आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

जंतर-मंतरवर करणार आज आंदोलन – संसदेतील विरोधी खासदारांचे निलबंन केल्याप्रकरणी विरोधक आज शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी संबोधित करणार आहेत.

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ः खरगे   – खरगे म्हणाले की, पंतप्रधान वाराणसी, अहमदाबादला जात आहेत, ते सगळीकडे बोलत आहेत, पण संसदेच्या सुरक्षेवर नाही. गृहमंत्री अमित शहा यांनीही संसदेच्या सुरक्षेबाबत काहीही बोलले नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारला सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. संसदेत बोलणे हा आमचा अधिकार आहे. सभापती प्रकरणाला जातीय रंग देत आहेत.

अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस – आगामी लोकसभा निवडणूक बघता मोदी सरकारचे शेवटचे पूर्णकालीन अधिवेशन आहे. कारण फेबु्रवारीमध्ये होणार्‍या अधिवेशनानंतर मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होणार आहे. तसेच 4 डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज 22 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आज शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असेल.

COMMENTS