Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाईचा सरकारने घेतला धसका

विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध

नागपूर : पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक प्रकरणानंतर राज्य सरकार सावध झाले असून, सोमवारी सक

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका
क्रिकेटर कैया अरुआचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन
खरीप पिके झाली उध्दवस्त, शासनाने भरपाई द्यावी

नागपूर : पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक प्रकरणानंतर राज्य सरकार सावध झाले असून, सोमवारी सकाळी विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. सोमवारी पहिल्या दिवशी विधिमंळात येणार्‍या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले.


शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली. पुणे येथे समता सैनिक दलाच्या सैनिकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक केली. या प्रकरणी दोन लोकांसह एक पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एका ठिकणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद दिसून आले. आज पहिल्या दिवशी येथे येणार्‍या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. त्यामुळे सरकारने शाई प्रकरणाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे. याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याकडून काळजी घेतली जात आहे.

COMMENTS