Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीष इरनाक याचे गौरवोद्गार

कराड / प्रतिनिधी : गतवेळी सन 2017-18 मध्ये लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. त्याचवर्षी महाराष्ट्राला 11 वर्षांनंतर

लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती
धोनी खेळणार रविंद्र जडेजाच्या नेतृत्त्वात;भिडणार श्रेयस अय्यर सोबत

कराड / प्रतिनिधी : गतवेळी सन 2017-18 मध्ये लिबर्टी मजदूर मंडळाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले. त्याचवर्षी महाराष्ट्राला 11 वर्षांनंतर अजिंक्यपद मिळाले, हा अतिशय चांगला योगायोग होता. लिबर्टी मजदूर मंडळ हे अतिशय जुने क्रीडा मंडळ असून या मंडळाला एक दैदिप्यमान गौरवशाली इतिहास आहे, असे आंतरराष्ट्रीय प्रो. कब्बडी खेळाडू गिरीश इरनाक याने गौरवोद्गार काढले.
सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व प्रो. कब्बडी खेळाडू गिरीश इरनाक उपस्थित राहिला होता. लिबर्टी मजदूर मंडळातर्फे गिरिष इरनाक यांचा लिबर्टी मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अरुण जाधव, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. मानसिंगराव पाटील, मुनीर बागवान, काशिनाथ चौगुले, रमेश जाधव, सुहास डोळ, उत्तम माने, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, राजेंद्र पवार, विनायक पवार, भास्कर पाटील, बाळासाहेब मोहिते, नंदकुमार बटाणे, विजय गरुड, राजेंद्र जाधव, सचिन पाटील यांच्यासह लिबर्टी मजदूर मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय व प्रो. कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आल्यानंतर खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी खेळाडूंशी संवाद साधला व अनेकांनी त्यांच्या खेळाचे कौतुक केले. तसेच लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेमधील खेळाडूंची ओळख व नाणेफेक गिरीष इरनाक यांच्याकडून करण्यात आले.

सेल्फी व फोटोची हौस अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय व प्रो. कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक याच्यासोबत कबड्डी खेळाडू आणि लिबर्टी मंडळाच्या खेळाडूंसह स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या कराडकर नागरिकांनी गिरीष इरनाक त्याच्याबरोबर फोटो व सेल्फीचा आनंद घेतला. गिरीष इरनाक यांनेही हसतमुखाने सर्वांना याचा आनंद दिला.

COMMENTS