Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू बाबाच्या सांगण्यावरून आई -वडिलांची मुलीला जबर मारहाण मारहाणीत मुलीचा मृत्यू.

याप्रकरणी आई,वडील आणि बहिणीला अटक.

 नागपूरच्या सुभाष नगर(Subhash Nagar) परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे(Siddharth Chimane) व त्याची पत्नी रंजना चिमणे(Ranjana chimane) यांना सहा व

भगव्या स्वराज्यध्वजासह पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी
नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा अपघात, 43 प्रवासी जखमी
अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरणारे चार गुन्हेगार जेरबंद

 नागपूरच्या सुभाष नगर(Subhash Nagar) परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे(Siddharth Chimane) व त्याची पत्नी रंजना चिमणे(Ranjana chimane) यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, ठीक नसल्याने तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. त्यांनी एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता…अखेर भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला हात पाय बांधून  बेल्ट आणि हाताने जबर मारहाण करण्यात आली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला. मात्र पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आणि या प्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे..तर संशयित भोंदू बाबा ला ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

COMMENTS