चुकीच्या रेल्वेमध्ये चढली म्हणून तरुणीनं रेल्वेतून मारली उडी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुकीच्या रेल्वेमध्ये चढली म्हणून तरुणीनं रेल्वेतून मारली उडी.

आरपीएफच्या जवानाने तरुणीचे वाचवले प्राण

गोंदिया प्रतिनिधी- 'धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडणे धोकादायक आहे', असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण, प्रवासी नको ते

आतापर्यंत दहा हजार वाहनांची तपासणी
प्रकटेश्वर महाराजांची पायी दिंडी गुजरात च्या दिशेने रवाना 
उपमुख्यमंत्री यांच्या घरी बसुन कायदा बनवा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही – प्रवीण तोगडिया

गोंदिया प्रतिनिधी- ‘धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावती रेल्वे पकडणे धोकादायक आहे’, असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं. पण, प्रवासी नको ते धाडस करून स्वत:चा जीव धोक्यात घालता. दरम्यान अशीच एक घटना गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली आहे. चुकीच्या रेल्वेमध्ये चढले म्हणून एका तरुणीनं रेल्वेतून उडी मारली. यावेळी ती तरुणी रेल्वेखाली चालली होती, पण वेळीच आरपीएफच्या जवानाने देवाप्रमाणे धाव घेऊन वाचवले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

COMMENTS