Homeताज्या बातम्यासंपादकीय

हिंडेनबर्गचे भूत पुन्हा सज्ज

भारताच्या मानगुटीवर बसण्यासाठी हिंडेनबर्गचे भूत पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. कारण हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी एक्स या सोशल माध्यमावर

खडसे अडकले राजकीय चक्रव्युहात
अंबानी, अदानी आणि राजकारण
राजकारणात आणखी एक गांधी

भारताच्या मानगुटीवर बसण्यासाठी हिंडेनबर्गचे भूत पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. कारण हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी एक्स या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत भारतासंबंधी लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे संकेत दिले आहे. मात्र ते कोणता खुलासा करणार, यासंदर्भात त्यांनी गोपनीयता पाळली असून, सोमवारी ते हा खुलासा करणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने काही खळबळजनक अहवाल समोर आणले होते. यामध्ये अदानी समूहावर गंभीर आरोप केल्यानंतर मोदी सरकारसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विरोधकांनी लोकसभा डोक्यावर घेत जेपीसी अर्थात संसदीय समितीची संयुक्त समिती नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. तर याविरोधात अदानी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दरवाजे ठोठावले होते. या संपूर्ण प्रकरणात अदानी यांच्या संपत्तीत कोट्यावधींचे नुकसान झाले होते. अदानी यांचे शेअर कोसळून त्यांचे कोट्यावधी संपत्तीचे नुकसान झाले होते. त्यातून अदानी समूह सावरत असतांना पुन्हा एकदा हिंडेनबर्गने मोठा खुलासा करणार असल्याचा दावा केला आहे. खरंतर या दाव्यामुळे भारताच्या राजकारणात आणि उद्योगसमुहात भूकंप होण्याची शक्यता आहे. देशामध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे यासाठी कोणत्या उद्योजकांनी कुणासाठी  किती पैसा खर्च केला, त्यासाठी सरकारच्या वतीने त्या उद्योजकाला किती मदत केली, त्याची संपत्ती वाढवण्यासाठी किती मदत केली, याचे खुलासे होणार असेल तर, सत्ताधार्‍यांसाठी मोठ्या अडचणीचे ठरू शकते. यासोबतच जर उद्योजकांविषयी या अहवालात अनेक धक्कादायक बाबी असल्यास त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर बघायला मिळू शकतात. महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका येवू घातल्या आहेत. शिवाय या निवडणुकीत सर्वंच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत हातात घ्यायचा हा निश्‍चय जसा महायुतीने केला आहे, तसाच तो महाविकास आघाडीने देखील केला आहे. त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी दोन्हीकडून शर्थीचे प्रयत्न होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हिंडेनबर्गचा अहवाल काय गौप्यस्फोट करतो, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतात का, या सर्व बाबींचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. खरंतर हा गौप्यस्फोट लोकसभा निवडणूक संपल्यावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला या गौप्यस्फोटामुळे फारसा परिणाम होणार नाही. जर तोच गौप्यस्फोट अदानी समुहाशी संबंधित असल्यास अदानी समूहाच्या अडचणी वाढू शकतात. कारण गेल्यावर्षी म्हणजे दीड वर्षांपूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी अदाणी समूहात गत कैक वर्षांपासून घोटाळे सुरू असल्याचा अहवाल प्रकाशित केला होता. अदानी समूह बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोपही हिंडेनबर्गने केला होता. कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने समभागांचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. त्यामुळे अदाणी समूहातील कंपन्यांचे समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर 125 अब्ज डॉलरच्या आसपास समूहाच्या बाजारमूल्याचे पतन झाले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने 106 पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे अदानी समूह गोत्यात आला होता. अदानी समूहाची संपत्ती सारखी घटतांना दिसून येत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अदानी समूह या धक्क्यातून सावरत नाही तोच, हिंडेनबर्ग पुन्हा एकदा नवा धमाका घेवून आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या नव्या धमाक्यातून आता कुणाची विकेट हिंडेनबर्ग घेणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. शिवाय महाराष्ट्रासंबंधित जर या अहवालात गौप्यस्फोट असल्यास विधानसभा निवडणूक या गौप्यस्फोटांनी प्रभावित होवू शकते, हे नक्कीच. 

COMMENTS