Homeताज्या बातम्यादेश

भाजपच्या विकास मॉडेलवर झेन-जी पिढीचा विश्‍वास ः पंतप्रधान मोदी

मालदा : भाजपने राबवलेल्या विकासकेंद्रित धोरणांवर देशातील जनतेचा, विशेषतः झेन-जी पिढीचा ठाम विश्‍वास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन

सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…
मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
भूपेंद्र पटेलांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ-पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

मालदा : भाजपने राबवलेल्या विकासकेंद्रित धोरणांवर देशातील जनतेचा, विशेषतः झेन-जी पिढीचा ठाम विश्‍वास असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्‍चिम बंगालमधील मालदा येथून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला शनिवारी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते जनतेला संबोधित करत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपावरील जनतेचा विश्‍वास सातत्याने वाढत आहे. ओडिशामध्ये प्रथमच भाजपाचे सरकार सत्तेत आले असून त्रिपुरामध्ये अनेक वर्षांपासून पक्षाला जनतेचा पाठिंबा लाभत आहे. आसाममध्ये मागील निवडणुकांत भाजपाला स्पष्ट जनादेश मिळाला, तर अलीकडे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा-एनडीए सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालच्या चारही बाजूंना सुशासन देणारी भाजपाची सरकारे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आता बंगालमध्येही सुशासनाचा नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. भाजपाविरोधात अनेक वर्षे खोटे आरोप आणि अफवा पसरवण्यात आल्या, मात्र आजचा मतदार वास्तव ओळखून भाजपाला पाठिंबा देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सध्याचा जनतेचा उत्साह पाहता, आगामी काळात पश्‍चिम बंगालमध्येही भाजपाला मोठा कौल मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला ऐतिहासिक यश मिळाल्याचेही मोदी यांनी नमूद केले. विशेषतः मुंबई महानगरपालिकेत भाजपाने प्रथमच विक्रमी विजय मिळवला असून, केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथेही भाजपाचा महापौर निवडून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या ठिकाणी भाजपाचा विजय अशक्य मानला जात होता, तेथेही आज अभूतपूर्व जनसमर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालच्या विकासासाठी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, नव्या रेल्वे सेवांमुळे प्रवास अधिक सुलभ होईल, तसेच व्यापार व उद्योगांना चालना मिळेल. ट्रॅक मेंटेनन्ससारख्या सुविधांमुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत
भारतीय रेल्वेच्या आधुनिक प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील मालदा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी या ऐतिहासिक गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही अत्याधुनिक ट्रेन हावडा-गुवाहाटी (कामाख्या) मार्गावर धावणार असून, पूर्वोत्तर भारताला जलद आणि आरामदायी रेल्वेसेवेशी जोडणारी ठरणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 3,250 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही केले.

COMMENTS