गॅसकटरने एटीएम फोडून 3 लाख चोरट्यांनी लांबवले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅसकटरने एटीएम फोडून 3 लाख चोरट्यांनी लांबवले

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगर तालुक्यातील चास गावात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील तीन लाख रुप

रेणुकामाता मल्टीस्टेट ची सर्व बँकांच्या ग्राहकांसाठी ए.टी.एम सुविधा सुरू
निळवंडेतून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी
बहिण माझी लाडकी योजनेत अजित पवार गटाची गोची

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे महामार्गावरील नगर तालुक्यातील चास गावात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील तीन लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चास गावांमध्ये पहाटे दोनच्या सुमाराल इंडिकॅश एटीएम सेंटरमध्ये चारजण आतमधे शिरले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारेसुद्धा होती. चोरट्यांनी या ठिकाणी गॅस कटरचा वापर केला व सुमारे तीन लाख रुपये लांबवले. ही घटना रविवारी सकाळी गावकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह येऊन घटनेची माहिती घेतली. या ठिकाणी असलेले सीसीटीवी फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम फोडले आहे त्यांची चेहरेपट्टी स्पष्ट दिसत नसली तरी काही धागेदोरे पोलिसांना हाती लागत आहे, निश्‍चितपणे या घटनेचा तपास केला जाईल असे पोलीस निरीक्षक सानप सांगितले.

COMMENTS