Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेकाचे फळ मनुष्याचे कल्याण करते डॉ. गुट्टे महाराज

नाशिक प्रतिनिधी -  विवेक सत्संगाने जागृत होत असून,  तो आत्म्याला आनंदित करत असतो. स्वतःसह दुसऱ्यांना देव बनवण्याची शक्ती आत्म्यात आहे.  आत्मशक्ती

पुणे-नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी
मामे बहिणीसह भावाचा बुडून दुर्दैवी मृत्यू | LOKNews24
विरोधासाठी व्यापार्‍यासह राजकिय नेते लक्ष्य

नाशिक प्रतिनिधी –  विवेक सत्संगाने जागृत होत असून,  तो आत्म्याला आनंदित करत असतो. स्वतःसह दुसऱ्यांना देव बनवण्याची शक्ती आत्म्यात आहे.  आत्मशक्ती सत्संगाने जागृत होते. सत्संगा शिवाय जीवनात दिव्यता येत नाही. संत महात्म्यांनी दिलेले दिलेले विवेकाचे फळ मनुष्याचे कल्याण करते,  असे विचार श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.  पंचवटीतील अमृतधाम, हनुमान नगर येथील भक्ती  महिला भजनी मंडळातर्फे गुरूवार दि.२८ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ या कालावधीत 

संगीतमय भागवत कथेस प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.  डॉ गुट्टे महाराज यांनी सांगितले की, संत महात्म्यांनी दिलेले दिलेले विवेकाचे फळ मनुष्याचे कल्याण करते. श्रीमदभागवत कथा श्रवण केल्याने आदीदैविक, अध्यात्मिक आणि आदीभौतिक ताप नाहीसे होऊन मनशांती मिळते. आपल्यात सकरात्मक बदल दिसून येतात. नामस्मरण मनाला शुध्द करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने नाम स्मरण करावे. कर्मावर विश्र्वास ठेऊन कार्य करावे. आपले कर्म श्रेष्ठ बनवा , म्हणजे आपो आप प्रगती होइल, असेही महाराजांनी सांगितले. कथेत  गणेश महाराज मस्के (तबलावादक),   आबासाहेब जाधव महाराज (सिंतवादक) यांनी  संगीतसाथ दिली. तर अंकुश महाराज थोरात यानी सुरेळ असे गायन केले.  दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत होणाऱ्या कथेस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक भक्ती  महिला भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS