Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेचे बिबटे कार्यालयात सोडू- जिल्हाप्रमुख  बारसे

अर्धापूर  प्रतिनिधीजिल्ह्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ सुरू आहे. वनविभाग बघायची झोपेचे सोंग घेत आहे.वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेना स

सडे परिसरात बिबट्यांची दहशत ; पिंजरा लावण्याची मागणी
पढेगावला बिबट्याची मादी जेरबंद
राहात्यात कोंबडीच्या आमिषाने बिबट्या जेरबंद

अर्धापूर  प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ सुरू आहे. वनविभाग बघायची झोपेचे सोंग घेत आहे.वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून शिवसेनेचे बिबटे वन विभागाच्या कार्यालयात सोडण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहेत.वनविभाग व सरकार वेळकाढू धोरण अवलंबित आहे.तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतातील कामासाठी कोणीच रोजदार मिळत नाहीत सालगडी भितीमुळे कामे करीत नसल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरणात असल्यामुळे शेतीतील कामे खोळंबली आहेत.  सरकार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतेच पावले उचलत नाही. शासन व वनविभाग माणसे मरण्याची वाट बघत आहेत काय असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी केला आहे. अर्धापूर तालुक्यातील बारसगाव येथे बिबट्याने बैलावर हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला असून बैलाला चाराही खाता येत नाही. बामणी शिवारात वासराच्या फट्या पडल्या होत्या.तर रोडगी,पांगरी,निमगाव  शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरे दगावली आहेत वन विभाग म्हणतो की हा बिबट्याचा हल्ला नसून दुसर्‍यास कशाने तरी हल्ला केल्याची बनवाबनवी करून वेळ मारून नेत आहेत. मागील आठवड्यात बिबट्या निवघा शिवारात आढळल्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाले होते. वनविभाग कुंभकर्ण झोपेत असून माणसे मारल्याने बिबट्याचा बंदोबस्त करणार काय असा सवाल वनविभागाला जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी केला आहे. पंधरा दिवसाच्या बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा शिवसेनेचे बिबटे वन विभाग कार्यालयास सोडू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी वन विभागाला दिला आहे.

COMMENTS