Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात थंडीचा जोर वाढला

परभणीत नीचांकी तापमानाची नोंद

पुणे प्रतिनिधी - राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर नव्हता. मात्र वातावरणातील बदलामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला आह

अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला; फळबागा आणि रब्बीच्या पिकांवर परिणाम
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
आसावरी रासकरचे दिल्लीतील यशाने खेड बुद्रुक येथे सन्मान

पुणे प्रतिनिधी – राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर नव्हता. मात्र वातावरणातील बदलामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानातील बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात कडाक्याची थंडी पडत असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे.


याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने थंडी वाढत असल्याने शेकोट्या पेटल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिमालयातून येणार्‍या थंड वार्‍याच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचे प्रमाण वाढले आहे. औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील तापमान खालावले असून परभणीत निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाण्यातही तापमान कमी झाले आहे. विदर्भातील गोंदियात 8.8 तर परभणीत 6.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या मंदोस या चक्रिवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या 12 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान कोकण, मुंबई, पुण्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या असलेले तापमान आणखी खालावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

COMMENTS