Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर बाजार समितीवर शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा फडकविणार

राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीय नेते एकत्रइस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधा

पाण्यासाठी वडूजमध्ये नागरिकांचा रास्ता रोको; आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत
कत्तलीसाठी नेताना दुभत्या गायींची गाडी पलटी
”दिखाव्या”ची शासन आपल्या दारी ”योजना” आपल्या दारी नको : खटाव तालुक्यातील जनतेची अपेक्षा : तहसील कार्यालयात हेलपाटे मारून नागरिक बेजार

राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षीय नेते एकत्र
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीयांना एकत्रित करत शेतकरी परिवर्तन पॅनेलची निर्मीती केली आहे. या पॅनेलच्या माध्यमातून एकास एक लढत दिली आहे. या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनेलचा झेंडा बाजार समितीवर फडकवणार असल्याचा वि श्‍वास शेतकरी पॅनेलच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, काँग्रेसचे विजय पवार, शेतकरी संघटनेचे धनपाल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
निशिकांत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रित येत तुल्यबळ लढत देण्याचे ठरवले आहे. ही निवडणुक आगामी निवडणुकीची दिशा ठरवेल तसेच राजकीय चित्र बदलले दिसेल.
राहुल महाडिक म्हणाले, गेल्या दोन दिवसापासून सर्व पक्षीय एकत्रित बसून एकत्र लढत देण्याचा निर्णय घेतला. जागा वाटपामध्ये रस्सीखेच होती. यावर तोडगा काढत एकास एक उमेदवार देण्यात आले आहेत.
सम्राट महाडिक म्हणाले, ही निवडणुक परिवर्तनाची निवडणुक आहे. सत्ताधा-यांच्यावर शेतकरी व सभासदातून नाराजी आहे. ही नाराजी मतपेटीतून दिसणार आहे. आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत. तळागाळापार्यंत पोहचणारे आहेत.
आनंदराव पवार म्हणाले, चुकीच्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज भरले. यातील एक अपात्र ठरला आहे. उर्वरीत तीन जणांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर मलगुंडे, डॉ. सचिन पाटील, नंदकुमार निळकंठ, पै. जयकर कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS