Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल

पुणे ः पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान मतदारांना प्रभावित

राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी आज मतदान
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
बांगलादेशातील सत्तांतर आणि भारतासाठी नवे समीकरण

पुणे ः पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान मतदारांना प्रभावित करण्याच्या आरोपातून शहरात पहिल्यांदाच गुन्हा दाखल होण्याची घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून, शुक्रवारी मध्यरात्री मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलावर आणि इतर काही जणांवर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मतदारांना पैसे देऊन प्रभावित करण्याचा तसेच मतदार याद्यांचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधितांवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरे याच्यासह एकूण 15 जणांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, हा प्रकार आचारसंहितेच्या स्पष्ट उल्लंघनात मोडतो, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रभाग 9 मधील भाजप उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी या कथित प्रकाराबाबत थेट राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे तक्रार केल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले. प्रचाराच्या नावाखाली रात्री उशिरा मतदारांची नावे संकलित केली जात असल्याचा आरोपही समोर आला असून, एका महिलेला कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या जबाबदारीबाबतचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

COMMENTS