वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

Homeताज्या बातम्या

वडिलांनी विष पाजून दोन्ही मुलांची केली हत्या

दोन्ही मुलांना विष पाजून वडिलांनी संपविलं स्वतःला दुहेरी हत्याकांडाने खळबळ

चंद्रपूर प्रतिनिधी -  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या ग

डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यानंतर इलायाराजा कडून पुनरावृत्ती !
बाळाच्या तोंडावर चिकटपट्टी लावणार्‍या नर्सेसवर कारवाई
स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे

चंद्रपूर प्रतिनिधी –  दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या गावात शेतात वडिलाचा मृतदेह सापडला. विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात आर्थिक विवंचनेतून मुलांची हत्या केल्याचा तसेच आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. वरोरा शहराजवळील बोर्डा  गावात काल संजय कांबळे या व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा विष पाजून त्यांचा खून केला होता. सुमित (7) आणि मिष्टी (3) अशी मृतक मुलांची नावं आहेत. वरोरा आणि गिरड पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS