Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजारो उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

आज सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार मतमोजणीबोटावरील शाई पुसली जात असल्याने गोंधळमुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2 हजार 869 जागांसाठी गुरूवारी मतदा

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी
कार्यकर्त्यांचा हिरमोड आणि गोंधळ !

आज सकाळी 10 वाजेपासून सुरू होणार मतमोजणी
बोटावरील शाई पुसली जात असल्याने गोंधळ
मुंबई ः राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2 हजार 869 जागांसाठी गुरूवारी मतदानाचा धुरळा उडाला असून एकूण 15 हजार 908 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. आज शुकवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोटावर लावलेली शाई नेलपॉलिश रिमुव्हरने ही शाई अगदी सहजपणे निघत असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी या प्रकारावर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाने दुबार व बोगस मतदानाला हातभार लावण्यासाठी ही शाई वापरली काय? असा सवाल या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. मतदानानंतर मतदारांच्या बोटावर लावली जाणारी ओळख निशाणी सहज पुसली जात असल्याचे अनेक मतदारांनी अनुभव सोशल मीडियावर मांडले आहेत. या प्रकारामुळे दुबार मतदानाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून, आधीच विविध आरोपांच्या भोवर्‍यात सापडलेल्या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
साधारणतः मतदानानंतर न पुसली जाणारी विशेष शाई वापरली जाते. मात्र, यावेळी अनेक मतदान केंद्रांवर थेट मार्कर पेनचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही मार्करची निशाणी काही वेळातच पुसली जात असल्याने मतदान प्रक्रियेतील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. हा प्रकार केवळ एखाद-दुसर्‍या केंद्रापुरता मर्यादित नसून, मुंबईसह राज्यातील विविध शहरांतून अशाच तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर आणि पूर्वतयारीवर संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाहेर या, शाई पुसा, पुन्हा मत द्या हा विकास आहे का? ः राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हीव्हीपॅट अभावी महापालिका निवडणुकीत दिलेले मतदान कुणाला जात आहे कळायला कोणताही मार्ग नसल्याची चिंता व्यक्त केली आहे. हे सरकार ऐनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ते करत आहे. प्रशासनही सत्तेसाठीच काम करत आहे. त्यातच निवडणूक प्रक्रियेत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे दिलेले मतदान कुणाला जातंय हे कळायला कोणताही मार्ग उरला नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेत मार्कर वापरण्यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मतदान करा, बाहेर या, शाई पुसा व पुन्हा आत जाऊन मतदान करा हा विकास आहे का? असे ते म्हणाले.

मतमोजणी एक तास उशीराने होणार सुरू
आज शुक्रवारी सर्व महानगरपालिकांची मतमोजणी नेहमीच्या वेळेपेक्षा एक तास उशिरा, म्हणजे सकाळी दहा वाजता सुरू होणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मतदान आणि मतमोजणी यांमधील कालावधी कमी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. पाडू मशीनचा मतदान प्रक्रियेशी कोणताही संबंध नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याचे स्पष्ट
बोटावर शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यात आल्याची बाब आता मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकृतपणे मान्य केली आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, राज्य निवडणूक आयोगाकडून शाईऐवजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, नखांवर लावलेली ही मार्करची निशाणी पुसली जात असल्याची समस्या समोर आल्याचे त्यांनी कबूल केले.

शाई पुसली जात नाही : आयुक्त वाघमारे
मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचे आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी जोरकसपणे फेटाळून लावलेत. राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावण्यासाठी तिला सुकण्यासाठी 10-12 सेकंद लागतात. एवढा वेळ मतदार मतदान केंद्रातच असतो. त्यामुळे शाई पुसली जाण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. वाघमारे म्हणाले, भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरतो, तीच ही शाई आहे. एखादा मतदार एकदा मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर आला, तर तेथील निवडणूक अधिकारी निश्‍चितच त्याच्यावर कारवाई करतात.

COMMENTS