देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील लाख येथील सुभाष गल्हे या शेतकर्यांच्या शेत तळ्यातील विजपंप चोरुन नेताना शेतकर्यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडू

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील लाख येथील सुभाष गल्हे या शेतकर्यांच्या शेत तळ्यातील विजपंप चोरुन नेताना शेतकर्यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असता तपासा दरम्यान या तीन चोरट्यांनी चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली असुन दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. दोन मोटारसायकलचा शोध पोलिस शोध घेत आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती आशी की, लाख ता.राहुरी येथील सुभाष गल्हे या शेतकर्यांच्या शेत तळ्यावरिल विजपंप चोरुण नेताना शेतकर्यांनी रंगेहाथ या चोरट्यांना पकडले होते. तीन चोरट्यांपैकी एक चोरटा शेतकर्याच्या हाताला झटका देवून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्या नंतर तिसर्या आरोपीचा शोध घेवून त्यास अटक केल्या नंतर विजपंप चोरी बरोबर चार मोटारसायकली चोरल्याची कबुली या चोरट्यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाणाहून मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिस पथक मोटरसायकल चोरणार्या टोळीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरुन दोन संशयतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु अटकेनंतर गुन्ह्याची कबूली देऊन त्यांच्या एका साथीदाराची माहिती दिली. यावेळी पथकाने तीसर्या आरोपीस उंदीरगाव ता श्रीरामपूर येथून चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले. तपासादरम्यान एकूण दोन मोटसायकल जप्त केलेल्या असून आरोपींनी देवळाली प्रवरा व टाकळीमिया या ठिकाणावरून अजून दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपी मध्ये नावेद इब्राहिम शेख वय 23 (रा. जातप ता. राहुरी), मंगेश विष्णू ठाकर वय 22 (रा-सोमय्या फार्म ता. राहुरी) व किशोर अंकुश पवार वय 19 (रा.उंदीरगाव ता. श्रीरामपूर) या तिनही ही आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता सरकारी वकील गागरे यांनी सरकारतर्फे बाजू मांडून तीन दिवस पोलीस कोठडी मिळवली होती. सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते,पोहेकों सुरज गायकवाड, पो. ना. प्रविण बागुल, पो. को. प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजणे, पो.काँ. गोवर्धन कदम, जयदीप बडे, अजिनाथ पाखरे, सतीश कुर्हाडे, अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे मोबाईल सेल श्रीरामपुरचे पो.ना.सचिन धनाड, संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास पो. हे. कॉ. संदीप ठाणगे हे करीत आहे.
COMMENTS