Homeताज्या बातम्यामनोरंजन

असुर फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा

'इस प्यार को क्या नाम दू' ही टीव्ही मालिका त्याचप्रमाणे 'असूर' ही वेब सीरिज यामुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. अभ

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची हकालपट्टी
राज्यातील बंद उद्योगांना मिळणार ‘अभय’ : सुभाष देसाई
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान

‘इस प्यार को क्या नाम दू’ ही टीव्ही मालिका त्याचप्रमाणे ‘असूर’ ही वेब सीरिज यामुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्याच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. अभिनेता बरुण सोबती पुन्हा एकदा बाबा झाला. बरुण आणि त्याची पत्नी पश्मीन यांच्या घरी दुसऱ्या बाळाचे आगमन झाले असून त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यांना सिफत नावाची मुलगी आहे. अलीकडेच बरुण आणि पश्मीन त्यांची जवळची मैत्रीण दलजीत कौरच्या लग्नामध्ये दिसले होते. त्यावेळी पश्मीनच्या फोटोंवरुन ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधण्यात आलेला. दलजीतच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो समोर आलेले ज्यामध्ये पश्मीनचे बेबी बम्प दिसून आलेले. आता पश्मीन आणि बरुण यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. मात्र सोशल मीडियापासून बऱ्यापैकी दूर असणाऱ्या या जोडीने अद्याप कोणतीही सोशल मीडियावर कोणतीही घोषणा केलेली नाही.

COMMENTS