Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक बँक सभासदांना देत असलेल्या सुविधा दिशादर्शक व आदर्शवत : आनंद भंडारी 

अहिल्यानगर : एखाद्याच्या आयुष्याला दिशा देण्यामध्ये प्राथमिक शिक्षकाचा सर्वाधिक प्रभाव असतो.  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले श

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
चिखली येथे दारु चोरून विकणार्‍या इसमास अटक
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
Displaying WhatsApp Image 2025-10-14 at 19.40.48_8242bc1c.jpg

अहिल्यानगर : एखाद्याच्या आयुष्याला दिशा देण्यामध्ये प्राथमिक शिक्षकाचा सर्वाधिक प्रभाव असतो.  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यामुळे या शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी साहेब यांनी केले.

शिक्षक बँकेच्या ॲपद्वारे NEFT व IMPS या जलद आर्थिक व्यवहाराच्या सेवांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील साहेब व शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. चेअरमन शरदभाऊ सुद्रिक हे होते.

      यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी साहेब म्हणाले की भौतिक सुविधांबरोबरच शाळांमध्ये वाचन चळवळ सुरू व्हावी. प्रत्येक शाळेत अद्यावत वाचनालय असावे. आपण सुरू केलेला *माझी आदर्श शाळा* या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या १०० पेक्षा जास्त पट असलेल्या ६०१ शाळांची प्राधान्याने निवड करण्यात आलेली असून या शाळा सर्वच बाबतीत समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक पालकाला असे वाटले पाहिजे कि माझीही मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकली पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत उत्तरोत्तर वाढ होत असून त्यामुळे इंग्रजी माध्यमातून  पुन्हा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. आपल्यातील अनेक शिक्षक तसेच अनेक विद्यार्थी साहित्यिक, कवी आणि कलाकार आहेत. आपल्या संघटनेच्या मार्फत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन/कवी संमेलन आयोजित करून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. गेल्या चार महिन्यात आपले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही शिक्षकांचे  प्रश्न मी अगोदर मार्गी लावणार आहे असे प्रतिपादन माननीय श्री आनंद भंडारी साहेब यांनी केले. 

       यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले  शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील म्हणाले की शिक्षक बँकेचा राज्यामध्ये मोठा नावलौकिक असून बँकेच्या ॲपद्वारे सुरु होत असलेल्या IMPS आणि NEFT सारख्या सुविधा आता शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आल्यामुळे बँकेच्या लौकिकात भरच पडलेली आहे. भविष्यात त्याची व्यापकता वाढवावी सभासदांना सर्व सुविधा online करण्याच उदिष्ट ठेवाव मलाही या बँकेचा सभासद होण्याची खूप इच्छा आहे. मात्र माझे हे स्वप्न अद्याप तरी पूर्ण होऊ शकलेले नाही अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

       मिशन आरंभ या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होत आहे. हेच विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी म्हणून या देशाची सेवा करताना नक्की दिसणार आहेत. या उपक्रमामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच  यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जिल्हा परिषद शाळांतील विक्रमी विद्यार्थी यशस्वी होतील असा आत्मविश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

       बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी बँकेच्या सभासद हिताच्या विविध योजनांचा उल्लेख करत शिक्षकांच्या समृद्धीमध्ये बँकेचा मोठा वाटा असून आता सभासदांना घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे  जलद व सुरक्षित पध्दतीने आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. NEFT व IMPS या बँकेच्या सुविधांचा आज शुभारंभ होत आहे ही माझ्यासह सर्व शिक्षकांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

       यावेळी राज्य शिक्षक संघाचे नेते दत्ता पाटील कुलट, राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर, विभागीय अध्यक्ष राजेंद्र सदगीर, राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण साळवे, शिक्षक नेते अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, संघाचे जिल्हाध्यक्ष बबन गाडेकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुंगे,  उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुदनर, ऐक्य मंडळाचे  नेते बाळासाहेब कदम, शिक्षक भारतीचे मुकेश गडदे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते, बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर, व्हा. चेअरमन योगेश वाघमारे, संचालक डॉ. संदीप मोटे पाटील, रामेश्वर चोपडे, निर्गुणाताई बांगर-कापसे, कारभारी बाबर, अण्णासाहेब आभाळे, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, महेश भनभणे, ज्ञानेश्वर शिरसाठ,कैलास सारोक्ते, श्रीम. सरस्वती घुले, शशिकांत जेजुरकर, शिवाजी कराड, माणिक कदम या संचालकांसह विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, सचिव संतोष आंबेकर, विश्वस्त संतोष मगर, राजेंद्र निमसे, बाळासाहेब गमे, मुकुंद सातपुते उपस्थित होते. शिक्षक संघाचे नेते सर्वश्री नवनाथ तोडमल, संतोष भोपे, भास्करराव कराळे, साहेबराव अनाप, सूर्यभान काळे, नारायण पिसे, आबासाहेब दळवी, राजेंद्र ठोकळ, विठ्ठल काकडे, बाळासाहेब कापसे, बाबाजी डुकरे पाटील, संतोष दळे, कैलास सहाणे,  बाबा आव्हाड, सुयोग पवार, पांडुरंग काळे, विठ्ठल काळे, रवींद्र रोकडे, अश्पाक शेख, सुनील गायकवाड, आदीक बचाटे, संदीप पोखरकर, नामदेव शिरसाठ, गणेश पिंपळे, निवृत्ती धुमाळ, दशरथ देशमुख, संदीप ठाणगे, बजरंग गोडसे, संदीप होले, तुकाराम अडसूळ, अनिल शिंदे, सचिन ठाणगे, दत्तात्रय सिनारे, प्रकाश बर्वे, मिनिनाथ देवकर, भिमराज चाचर, अशोक कारले, नितीन पंडित, राजेंद्र राऊत, चंद्रकांत नरसाळे, गणेश गाडेकर, संजय पवार, विलास कदम, रमेश धोंगडे, कचरू बेनके, बॅंकेचे मुख्य कार्य. अधिकारी सुर्यकांत जगताप, उप मुख्य कार्य. अधिकारी गणेश पाटील आदिंसह शिक्षक व बँकेचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्ष निवड संचालक श्री अण्णासाहेब आभाळे यांनी केली तर  संचालिका निर्गुणा बांगर-कापसे यांनी अनुमोदन दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री प्रकाश नांगरे यांनी केले. संचालक श्री कारभारी बाबर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS