Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज भूमिपुत्राच्या हेल्मेट या लघुचिञपटाचा प्रदर्शन सोहळा उद्या

केज प्रतिनिधी - केज  येथील भूमिपुत्र प्रा. ज्ञानेश कलढोणे यांनी हेल्मेट किती आवश्यक आहे. ही माहिती देणारे हेल्मेट लघू चित्रपट पुर्ण केले. या चित

महावितरणच्या गलथानपणामुळे ६० ते ७० एक्कर उस पेटला | LOKNews24
कला शिक्षक निर्मळ यांनी रेखाटला अक्षर गणेश
वारी’तून सामाजिक समतेच्या दिशेने प्रवाहित !

केज प्रतिनिधी – केज  येथील भूमिपुत्र प्रा. ज्ञानेश कलढोणे यांनी हेल्मेट किती आवश्यक आहे. ही माहिती देणारे हेल्मेट लघू चित्रपट पुर्ण केले. या चित्रपटाचा प्रदर्शन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. कलढोणे यांनी केले.
केज सारख्या ग्रामिण भागातुनही वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नावर लेखन करुन एका नव्या क्षेञात झेप घेवुन प्रवास करतांना हेल्मेट चा वापर करणे किती आवश्यक आहे. हे सांगण्यासाठी केज मधील ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक ज्ञानेश कलढोणे पुढे सरसावले आहेत.नुकतेच त्यांच्या हेल्मेट ( हशश्राशीं र्ोींळश ) या लघुचिञपटाचे चिञीकरण पुर्ण झाले असुन त्याचे प्रदर्शन दि.27/4/2023 सांयकाळी सहा वाजता ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस,जाजू काम्प्लेक्स ,कानडी रोड येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरिक्षक पंकज कुमावत हे करणार आहेत.या प्रसंगी पो.नि.बाळासाहेब पवार,उप निरिक्षक राजेश पाटील,डॉ.दिनकर राऊत,डी.डी.बनसोडे,डॉ.बी.जे हिरवे,प्रा.हनुमंत भोसले,प्रा.संतोष राऊत हे उपस्थित राहणार आहेत. या नविनतम कार्यक्रमासाठी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निर्माते व दिग्दर्शक प्रा.ज्ञानेश कलढोणे,कार्यकारी दिग्दर्शक रोषण एडके यांनी केले.

COMMENTS