Homeताज्या बातम्यादेश

विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला वाचवण्यात अख्ख कुटुंब संपलं

राजस्थान प्रतिनिधी - दिवाळीच्या तोंडावर एक संपूर्ण कुटुंब एकत्र संपल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने

जामखेड तालुक्यातील तीन रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण
 मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे – खासदार श्रीकांत शिंदे 

राजस्थान प्रतिनिधी – दिवाळीच्या तोंडावर एक संपूर्ण कुटुंब एकत्र संपल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. विद्युत प्रवाहापासून एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील सालुंबर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पहिले कुटुंबप्रमुखाला विजेचा धक्का बसला, त्यामुळे त्याची पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे आली, पण तिलाही विजेचा धक्का बसला. यानंतर दोन्ही मुलांनी आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला आणि चौघांचाही मृत्यू झाला. ही दुःखद घटना सालुंबर जिल्ह्यातील ढिकिया गावातील कुन भागात घडली. येथे ६८ वर्षीय उन्कार मीना यांच्या घरासमोर लोखंडी गेट बसवण्यात आले. गुरुवारी या लोखंडी गेटमधून अचानक विद्युत प्रवाह आला. गेटमधून विद्युत प्रवाह वाहत असताना उन्कारला विजेचा धक्का बसला. उन्कारचा आवाज ऐकून त्यांची पत्नी भंवरी मीना (६५) मदतीसाठी धावली, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. आई-वडिलांना विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांचा मुलगा देवीलाल (वय २५) तसेच मुलगी मंगी (वय २२) या दोघांना वाचवण्यासाठी पुढे आले. उन्कार आणि भंवरी यांच्या दोन्ही मुलांनाही विजेचा धक्का बसला आणि चौघांचाही तिथेच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन दाखल झाले आणि त्यांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शवागारात पाठवले आहे. त्यानंतर ते नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात येईल. याप्रकरणाचा तपास सध्या सुरु असल्याचं पोलिस सांगत आहेत. दिवाळी तोंडावर अशा पद्धतीने संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने नातेवाइकांमध्ये आणि परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

COMMENTS