Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेच्या वाट्याचा भावनिक ओलावा !

 गरज ही शोधाची जननी असते, अशी एक म्हण मराठी भाषेतही रूढ आहे. सध्या, महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेता; म

आरटीईतून मान्यताप्राप्त शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक : विनय गौडा
Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान
काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

 गरज ही शोधाची जननी असते, अशी एक म्हण मराठी भाषेतही रूढ आहे. सध्या, महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेता; महाराष्ट्रामध्ये नामशेष होऊ पाहणारे अनेक पक्ष एकमेकांना चिपकून आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करू पाहतात! काल, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु, यामध्ये भावनात्मक ओलावा कमी आणि राजकीय मुत्सद्दीपणा अधिक आहे. राज ठाकरे यांचा पक्ष गेल्या काही निवडणुकांपासून पेंदुलम झालेला आहे. कधी तो भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए आघाडीच्या मदतीसाठी धावून जातो; तर, कधी तो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या मदतीला धावून जातो. या मदतीला धावून जाण्याच्या भूमिकेत त्यांचं स्वतःचं निवडणूक तंत्र मात्र राहून जातं; आणि पक्ष वर्षानुवर्ष कोरा राहतो. आता तर, मनसेची थेट मान्यताच रद्द होण्याच्या पातळीवर आलेली आहे. अशा वेळी एक राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वाचवण्याचा प्रयत्न जर करायचा असेल, तर, आपली रक्ताची नाती बंधने कामात येतील, ही भावना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंमध्ये अधिक रुजली आहेत. त्यांचं एकमेकांना आलिंगन देणे सुरू आहे. खरे तर, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर कोणत्याही प्रकारची शक्ती वाढताना दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे जेव्हा आपल्या सोबत घेऊन गेले, तेव्हा, जनतेला हळहळ वाटली. काहीशी सहानुभूती वाटली. परंतु, त्याच जनतेने पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडच्या माणसांनाच अधिक प्रमाणात निवडून दिलं. उद्धव ठाकरेंचा पक्ष वाचला तो केवळ पुरोगामी मतांची त्यांना मिळालेली सहानुभूतीमुळे! त्यावरच हा पक्ष वाचलेला आहे आणि अशावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर या मतांमध्ये वाढ होण्याची त्यांना अपेक्षा आहे. राज ठाकरे यांनी देखील काही महिन्यांपासून आपली भूमिका पुरोगामी कशी वाटेल, या पद्धतीने आपलं वक्तव्य ही प्रसूत केली आहेत. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर राजकारण किंवा समाजकारण करताना पुरोगामी पार्श्वभूमी किंवा फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची बैठक ही अधिक महत्त्वपूर्ण ठरते; हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला माहित आहे. तेव्हा, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील आता फुले, शाहू, आंबेडकर हे नाव घ्यावं लागतं. कारण, महाराष्ट्राच्या मातीत या विचारांची रुजूवात फार खोलवर गेलेली आहे आणि ती खोलवर जाण्यामागची  कारणे  संत चळवळीपासून महाराष्ट्राने मानवी मूल्य समता ही मूल्य अधिक अनुभवली आहेत. त्यामुळे या मातीत रुजलेली ही विचार मूल्य सगळ्यांनाच आत्मसात करावी लागतात. महाराष्ट्रात त्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्या फुले, शाहू, आंबेडकरी मतदारांनी वाचवला, त्या मतदारांना आपण एकत्र आल्यामुळे अधिक आत्मविश्वास येईल आणि आपणही पुरोगामी भूमिका मांडायला सुरुवात करूया, याच भूमिकेतून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. परंतु, हे एकत्र येणं केवळ सत्तेच्या वाटा हिस्स्यासाठी असतं. ते जनतेच्या कल्याणासाठी नाही; हे आता गेल्या पंचवीस-तीस चाळीस वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने समजून घेतलेले आहे. त्यामुळे, जनतेला मूर्ख बनवता येत नाही. परंतु, जनता आपल्या भावना आणि विचार जेव्हा मतदानातून प्रकट करते, तेव्हा, ती या मातीत रूजलेल्या विचार मूल्यांशी प्रामाणिक असलेल्या शक्तींना पुढे आणण्याचा प्रयत्न करते, हा महाराष्ट्राचा स्थायीभाव आहे.

COMMENTS