Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध

पाथर्डी प्रतिनिधी- तीस वर्षापासून पाथर्डी शहरात कार्यरत असलेल्या लालकृष्ण अडवाणी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे य

पाथर्डीतील खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपी अवघ्या 12 तासात जेरबंद
चोरट्यांचा आता शेतातील पिकांवर डोळा
राहुरी तालुक्यात पावसासाठी साकडे

पाथर्डी प्रतिनिधी- तीस वर्षापासून पाथर्डी शहरात कार्यरत असलेल्या लालकृष्ण अडवाणी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात यश आले आहे. या पतसंस्थेचा कार्यकाल जानेवारी संपला होता.या निवडणुकीच्या संचालक पदासाठी एकूण ३६ अर्ज दाखल झाले होते.मागील निवडणुकीत एका संचालक पदासाठी मतदान झाले होते.परंतु यावेळी मात्र अकरा जागा बिनविरोध झाल्या आहेत.विद्यमान संचालक मंडळाचे अशोक गर्जे यांच्या गटाने आपले वर्चस्व आबाधित राखले आहे.

निवड झालेले संचालकांमध्ये  अशोक गर्जे,अमोल गर्जे,अजय भंडारी,अशोक मंत्री,सतीश तरटे,शिवाजी साखरे,प्रभाकर इजारे,संजय दराडे,रवींद्र उर्फ बंडू दानापूरे,प्रियंका मुकुंद गर्जे,नीता बाळासाहेब जिरेसाळ यांचा समावेश आहे. यावेळी अशोक गर्जे यांनी बोलताना म्हटले की,२०२३ ते २०२८ या कार्यायकाळात पतसंसंस्थेचे हित साधत सभासदाना जास्तीत जास्त लाभांश देत न्याय देण्याचे काम केले जाईल.

COMMENTS