संस्थापक सहकार पँनेलच्या तीन जागा बिनविरोध21 जागांपैकी सौरभ शिंदे गटाच्या महीला राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. शोभाताई बारटक्के,
संस्थापक सहकार पँनेलच्या तीन जागा बिनविरोध
21 जागांपैकी सौरभ शिंदे गटाच्या महीला राखीव गटातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. शोभाताई बारटक्के, माजी संचालिका सौ. ताराबाई पोफळे या दोन महिला व सोसायटी मतदार संघातून लालसिंगराव शिंदे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल मोरे असे एकूण तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
18 जागांसाठी 36 उमेदवार रिंगणात : तीन जागा झाल्या बिनविरोध
कुडाळ / वार्ताहर : जावळी तालुक्यातील एकमेव असणार्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून तालुक्यातील आजी-माजी आमदारांसह, अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दि. 28 रोजी 18 जागांसाठी एकूण 36 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने प्रतापगडच्या निवडणूकीचे बिगुल वाजले. यामुळे संस्थापक सहकार पॅनेलचे प्रमुख सौरभ शिंदे व कारखाना बचाव पॅनेलचे प्रमुख दिपक पवार यांच्या गटात दुरंगी सामना रंगणार आहे.
जावळी तालुक्यात प्रतापगड सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. प्रतापगड कारखाना बिनविरोध व्हावा याकरीता कारखान्याचे प्रमुख सैारभ शिंदे यांनी तालुक्यातील सर्व नेतेमंडळींना केले आवाहन केले होते. त्यानुसार कारखाना गट, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतही याबाबत बिनविरोधसाठी बैठक झाली होती. त्यानुसार सर्व गटांच्या समविचारी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मात्र, निवडणुक जाहीर झाल्यापासून बचाव पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक लढवण्याचे व सत्ताधार्यांना आवाहन निर्माण करण्याचा पवित्रा दिपक पवार यांनी घेतला होता, तो शेवटपर्यंत कायम राहिला.
अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही तरी राजकीय घडामोडी व तडजोडी होतील व निवडणुक बिनविरोध होईल, अशी आशा तालुक्यातील सभासदांना होती ती अखेर संपुष्ठात आली. प्रतापगड कारखान्याच्या 21 जागांपैकी 18 जागांसाठी आज अखेरच्या दिवशी 36 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणुक लागली आहे. यापैकी महीला राखीव मधून सौ. शोभाताई बारटक्के, सौ. ताराबाई पोफळे या दोन महिला व सोसायटी मतदार संघातून विठ्ठल मोरे असे एकूण तीन उमेदवार सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलमधून बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आता उर्वरित 18 जागांसाठी 13 मार्च रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यामुळे प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला असून उद्यापासून निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी प्रत्यक्ष पहायला मिळणार आहे.
COMMENTS