Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन , लवकरच ‘काटई’ पोलीस ठाणे होण्याची दाट शकत्या

कल्याण प्रतिनिधी - मानपाडा पोलिस ठाण्याची निर्मिती १९७० मध्ये झाली असून, पोलिस ठाण्याची हद्द तब्बल ६८ चौ.कि.मी.इतकी आहे.परिमंडळ 3 मधील सर्वात म

महाराष्ट्र बँकेत 1 कोटी 73 लाखांचा अपहार
सरकार आणि न्यायालय ओबीसींचा बळी घेताहेत काय?
अळसुंदे विद्यालयात वृक्षाबंधन व वृक्षदत्तक कार्यक्रम

कल्याण प्रतिनिधी – मानपाडा पोलिस ठाण्याची निर्मिती १९७० मध्ये झाली असून, पोलिस ठाण्याची हद्द तब्बल ६८ चौ.कि.मी.इतकी आहे.परिमंडळ 3 मधील सर्वात मोठे पोलीस हे आहे, त्यामुळे त्याचे विभाजन करावे अशी मागणी वारंवार केली जात आहे. दरम्यान मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्द विभाजनाची प्रतीक्षा संपुष्टात येण्याचे संकेत मिळत असून काटई हे नविन पोलिस स्टेशन लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. काटई पोलीस झाले की मानपाडा पोलिस ठाण्यावरचा ताण कमी होईल असे परिमंडळ 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले. मानपाडा पोलिस ठाण्याची हद्दीमध्ये ग्रामीण आणि शहरी भाग आहे. या हद्दीत मोठ्या गृहसंकुलांची उभारणी झाली आहे आणि अजून सुद्धा केली जात आहे. त्यामुळे या परिसरात नागरीकरण, कंपन्या, बार-रेस्टॉरन्टचे जाळे, कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पोलिस कर्मचारी वर्गामुळे कायदा सुव्यवस्था राखणे जिकिरीचे झाले आहे. एखादी गुन्ह्याची मोठी घटना घडली की, हद्दीच्या विभाजनाचा मुद्दा नेहमीच चर्चिला जातो. सप्टेंबर २०२१ मधील बहुचर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या वेळी स्थानिक सामाजिक संघटना, आजी-माजी लोकप्रतिनिधी या पोलीस स्टेशनचा विभाजनाचा मुद्दा उचलून धरला होता. अखेर या पोलिस ठाण्याच्या हद्द विभाजनाची प्रतीक्षा संपुष्टात येण्याचे संकेत मिळत असून काटई हे नविन पोलिस स्टेशन लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मानपाडा पोलिस ठाण्यावरचा ताण कमी होणार आहे.

COMMENTS