Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या उपस्थितीत शिर्डीला होणार जिल्हा काँग्रेसची बैठक

नेवासा फाटा/प्रतिनिधीः अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची शिर्डी लोकसभा व दक्षिण लोकसभाची आढावा बैठक,काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे

पाच जागांवर थोरात गटाचे उमेदवार विजयी
अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा
मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार | LOKNews24

नेवासा फाटा/प्रतिनिधीः अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची शिर्डी लोकसभा व दक्षिण लोकसभाची आढावा बैठक,काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते,मा.आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.अनुसूचित.जाती विभागाचे कार्यक्षम,कार्यकुशल अध्यक्ष,डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या उपस्थितीत 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता,हॉटेल साई छत्र.शिर्डी येथे संपन्न होणार आहे.
 प्रदेशाध्यक्ष.डॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ व दक्षिण लोकसभा मतदारसंघाबद्दल सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व विभागातील सेल व फ्रंटल यांच्याशी चर्चा करून आढावा घेणार आहेत.अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण बैठकीस अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.एकनाथ गोंदकर, प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी बंटी यादव,राष्ट्रीय काँग्रेस ओ.बी.सी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ,प्रदेश सचिव नितीन शिंदे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे, कोपरगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष तुषार पोटे, निराधार निराश्रीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रेवनाथ देशमुख, सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर पाटील कडू आधी पदाधिकार्‍यांच्या उपस्थित संपन्न होणार आहेत
 यावेळी राजेंद्र वाघमारे जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेसच्या सर्व विभागातील जिल्हाध्यक्ष सेलचे जिल्हाध्यक्ष फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष व प्रदेशवर काम करणारे सर्वच पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.या बैठकीच्या आयोजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी केले आहे.

COMMENTS