Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबकेश्‍वरमधील 10 आखाड्यांच्या विकासकामांचा शुभारंभ

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्च्या दृष्टीने त्र्यंबकेश्‍वर येथील दहा आखाड्यांमधील कामांचा शुभारंभ गुरूवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते  करण्यात आला

ग्रामविकासाला चालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीष महाजन यांच्या निधीतून वांगीत सभागृहांचे लोकार्पण
गिरीशचं रडणं अजून बंदच होईना : अजितदादांची टोलेबाजी
एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन, यांच्यात शाब्दिक बाचाबाची  

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्च्या दृष्टीने त्र्यंबकेश्‍वर येथील दहा आखाड्यांमधील कामांचा शुभारंभ गुरूवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते  करण्यात आला. प्रत्येक आखाड्यास 12 खोल्या बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मंत्री महाजन यांनी दिले आहे.
सिंहस्थ- कुंभमेळा ऑगस्ट 2027 मधे होणार असल्याने या कामांना गती दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात त्र्यंबकेश्‍वर येथील दहा आखाड्यांच्या कामांसाठी सात कोटी 55 लाखांची निविदा नगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे. या आखाड्यांच्या प्रमुख महंतांनी प्रत्येकी पाच कोटींची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. टप्प्याटप्प्याने हा निधी मिळणार असल्याने पहिल्या टप्प्यात प्रत्येक आखाड्याला साधारणतः 72 ते 78 लाखांची कामे मिळाली. यात शौचालय ब्लॉक, धर्मध्वज आणि सिमेंटचे रस्ते तयार करण्यात येतील. त्याचे उद्घाटन मंत्री महाजन यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

मूळ आखाडा, सद्गुरू गोरक्षनाथ आखाड्याचे नाव वगळले
त्र्यंबकेश्‍वरमधील 10 आखाड्यांच्या विकासकामांचा गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ झाला असला तरी आदियोगी आदिनाथ हा मुळ संप्रदाय म्हणजे साक्षात नाथसंप्रदाय ह्यात सामील आहेत की नाहीत हा विषय सध्या चर्चेचा आहे. दहा आखाडे हे पटलावर असल्याने मुळ आखाडा आणि गुरु शिष्य परंपरेचा सद्गुरू गुरु गोरक्षनाथ आखाडा जाहीर झालेल्या रकमांच्या यादीत न दिसल्याने त्रंबक नगरीत उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

आखाडानिहाय मंजूर निधी (रुपये)
जुना आखाडा : 78 लाख 12 हजार 816
महानिर्वाणी आखाडा : 72 लाख 60 हजार 140
अटल आखाडा : 75 लाख 29 हजार 279
निरंजनी आखाडा : 73 लाख 56 हजार 380
आनंद आखाडा : 74 लाख 29 हजार 056
आवाहन आखाडा : 74 लाख 88 हजार 133
अग्नी आखाडा : 77 लाख 65 हजार 644
निर्मल आखाडा : 76 लाख 42 हजार 590
नया उदासीन आखाडा : 75 लाख 52 हजार 047
बडा उदासीन आखाडा : 77 लाख 16 हजार 635

COMMENTS