Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकल मराठा समाजाचा निर्धार आरक्षण घेतल्याशिवाय  मुंबई सोडायची नाही 

नाशिक प्रतिनिधी - मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील पुकारलेल्या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च सुनावणी
मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण
आरक्षणासाठी 20 फेबु्रवारीला विशेष अधिवेशन

नाशिक प्रतिनिधी – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील पुकारलेल्या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता मार्केट कमिटी हॉल देवळा येथे तर दुपारी तीन वाजता सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट हॉल  बैठक पार पडली तर सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी तालुका निहाय बैठका संपन्न झाल्या.

या बैठकी प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव,वैभव दळवी,कल्पेश पाटील, ज्ञानेश्वर कवडे,निलेश टुबे,विक्रांत देशमुख आदी सह नाशिकहून मराठा समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी उपस्थित तिन्ही तालुक्यांतील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी सांगितले की,मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आता निकालाचा लढा गरीब मराठ्यांसाठी उभा केला आहे हा मुंबईचा शेवटचा लढा आहे  व या लढ्यासाठी मराठा समाजाने आता पूर्ण ताकदीने त्यांना साथ द्यायची असून त्यासाठी कसमादेतील तिन्ही तालुके ज्याप्रमाणे मराठा क्रांती मोर्चा नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे सहभागी झाले होते त्याच ताकदीने सर्व समाज बांधव पुन्हा एकदा मुंबई येथे येण्याचे नियोजन करा,आपल्याकडे जी वाहने असतील त्या वाहनांमध्ये आपल्या सोबत सर्व समाज बांधवांना एकत्र करून सर्वांनी 24 तारखेला सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिक येथील शिवतीर्थावर मुंबईला जाण्यासाठी मोठ्या संख्येने जमायचे आहे. सध्या सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये राजकीय पक्षाचे पुढारी त्यामध्ये आमदार, खासदार,जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांसह ग्रामपंचायती सह सरपंच यांचा सक्रिय सहभाग दिसून येत नाही,या सर्व नेत्यांना निवडणुकीत ओबीसी मते मिळणार नाही याची जर भीती वाटत असेल तर मराठा समाजाने सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत या एकही लोकप्रतिनिधींना मराठा समाजाची मते देवू नये असा संकल्प आपण सर्वांनी करूया, जे लोक सकल मराठा समाजाच्या आंदोलनात दिसतील त्यांच्या पाठीशी समाज उभा राहील जे लोक आंदोलनात येणार नाहीत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवला जाईल असा संकल्प करून समाजाने यापुढे आता हा लढा लढायचा आहे या लढ्यासाठी संपूर्ण ताकद मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपण देऊन मराठा आरक्षण मिळवूनच मुंबईतून परत घरी यायचे आहे त्याबाबत आता काटेकोरपणे आपण सर्वांनी नियोजन करावे असे आव्हान केले.

यावेळी तिन्ही तालुक्यात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते यामध्ये देवळा तालुक्यामध्ये भारत आहेर,राजेंद्र शिरसाट, नंदन देवरे,राजेश आहेर,सचिन मोरे, भाऊसाहेब चव्हाण सुनील चव्हाण,गोकुळ अहिरे,जितू चव्हाण,नितीन सावंत,संदीप आहेर,महेश शेवाळे,युवराज देवरे, समाधान देवरे,

सटाणा तालुक्यातील समाज बांधव पुढीलप्रमाणे उपस्थित होते त्यामध्ये योगेश सोनवणे विजयराज वाघ किशोर कदम लालचंद सोनवणे अरविंद सोनवणे अनिल पाटील डॉक्टर प्रसाद सोनवणे सुरेश नाना पवार वसंत भामरे संजय सोनवणे विशाल सोनवणे ज्ञानेश्वर देवरे संजय बिरारी आनंद सोनवणे प्रफुल आयरे राहुल पाटील हेमंत सोनवणे प्रशांत भारती फिरोज शेख भूषण शेवाळे संभाजी देवरे संदीप सोनवणे राकेश सोनवणे साहेबराव सोनवणे संग्राम राजे सुमित वाघ दादाजी सोनवणे विक्रम पाटील डॉक्टर आशिष सूर्यवंशी पिंटू बागुल अल्ताफ कादर शेख इत्यादींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळवण तालुक्यातील पुढील प्रमाणे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये प्रदिप पगार,प्रमोद रौदळ,जितेंद्र पगार, अजय पगार,अमित निकम,हेमंत पाटील, संतोष देशमुख,संदीप वाघ,संदीप शिंदे, मुन्ना काकूळते,रवी पगार,सुरेश पगार, स्वप्नील आहेर आदिसह समाज बांधव उपस्थित होते

COMMENTS