Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमी अभिलेख उपअधीक्षक लाच घेताना जाळ्यात

शेवगावमध्ये सापळा ; जमिनीच्या नोंदी दुरुस्तीसाठी २० हजारांची मागणी शेवगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाने जमिनीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी (दि १९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत उपअधीक्षक किरण अशोक कांगणे (वय ५२) व लाच स्वीकारणारा खाजगी इसम देवेंद्र त्रिंबक फुंदे (वय ४०) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतची हकिकत अशी की, तक्रारदार यांच्या नावावरील  बोधेगाव येथील सिटी सर्वे नंबर ४८९ च्या उताऱ्यावर असलेला धारण प्रकार व सत्ता प्रकार हा ‘फ’ ऐवजी ‘अ’ असा दुरुस्त करण्यासाठी उपअधीक्षक किरण कांगणे यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिनांक १९/०१/२०२६ रोजी पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.  त्यानंतर रचण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान उपअधीक्षक कांगणे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम थेट न घेता खाजगी इसम देवेंद्र फुंदे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव येथील गेटजवळ पंचासमक्ष फुंदे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.  या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे (ला.प्र.वि. नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे (ला.प्र.वि. अहिल्यानगर) करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे तसेच उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांचे मार्गदर्शन लाभले.

मंत्रालयातील लाचखोरी !
सा.बां.चा उपअभियंता 8.50 लाखांची लाच घेतांना अटक
5700 रुपयांच्या लाच प्रकरणी हदगावचे नायब तहसीलदार सुमन कर्‍हाळे निलंबित

शेवगावमध्ये सापळा ; जमिनीच्या नोंदी दुरुस्तीसाठी २० हजारांची मागणी

शेवगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाने जमिनीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी (दि १९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत उपअधीक्षक किरण अशोक कांगणे (वय ५२) व लाच स्वीकारणारा खाजगी इसम देवेंद्र त्रिंबक फुंदे (वय ४०) यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

याबाबतची हकिकत अशी की, तक्रारदार यांच्या नावावरील  बोधेगाव येथील सिटी सर्वे नंबर ४८९ च्या उताऱ्यावर असलेला धारण प्रकार व सत्ता प्रकार हा ‘फ’ ऐवजी ‘अ’ असा दुरुस्त करण्यासाठी उपअधीक्षक किरण कांगणे यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिनांक १९/०१/२०२६ रोजी पडताळणी केली. पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

 त्यानंतर रचण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान उपअधीक्षक कांगणे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम थेट न घेता खाजगी इसम देवेंद्र फुंदे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय, शेवगाव येथील गेटजवळ पंचासमक्ष फुंदे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

 या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे (ला.प्र.वि. नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे (ला.प्र.वि. अहिल्यानगर) करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे तसेच उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS