Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्राचे रक्षक समर्पणाने जीवन उजळून टाकतात

पंतप्रधान मोदी ः जवानांसोबत केली दिवाळी साजरी

शिमला ः हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे, त्यांच्यासोबत आनंद लुटण ेहा अभिमानाने भरलेला अनुभव आहे. आपल

गुजरातचे नागरिक सुजाण आणि विवेकी : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदींना दाऊदचे गुंड ठार मारणार
भारत सेमीकंडक्टरमध्ये जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान मोदींचा विश्‍वास

शिमला ः हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणे, त्यांच्यासोबत आनंद लुटण ेहा अभिमानाने भरलेला अनुभव आहे. आपल्या कुटुंबापासून दूर, आपल्या राष्ट्राचे हे रक्षक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. आपल्या सुरक्षा दलांचे धैर्य अतूट आहे. सर्वात कठीण प्रदेशात, त्यांच्या प्रियजनांपासून दूर, त्यांचे त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवतात. शौर्य आणि प्रतिकूल परिस्थितीत लढणार्‍या वीरांचे भारत सदैव ऋणी राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील सीमावर्ती भाग असलेल्या लेप येथे सुरक्षा दलांची भेट घेत दिवाळी साजरी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात गुंतलेल्या सैनिकांना ड्युटीमुळे घरी जाता येत नाही. अशा परिस्थितीत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासू नये म्हणून, मी येथे आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यानंतर, 2018 मध्ये, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी 2020 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केली आहे.

COMMENTS