पाटोदा प्रतिनिधी - पाटोदा तालुक्यातील चिखली या गावातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे हे गेल्या अनेक

पाटोदा प्रतिनिधी – पाटोदा तालुक्यातील चिखली या गावातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे हे गेल्या अनेक महिन्या पासून चिखली ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत असुन या मध्ये माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी जातीय द्वेषातून संगणमत करत जाणीवपूर्वक ग्रामपंचायत मासिक सभा दाखवून बनावट खोटा ठराव बनवून मागासवर्गीय नागरिकांना पाणी देणार्या विहिरीचा सभोवतालचा परिसर अस्वच्छ आहे तसेच त्या विहिरीत पावसाळ्यात सर्व घाण वाहून जाते त्या विहिरीस अंगचे पाणी नाही या सर्व गोष्टीची माहिती असताना देखील माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगणमत करून शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाटोदा यांना हाताशी धरून दलित वस्तीस पाणी पुरवठा करणार्या योजनेचा बनावट ठराव व दस्ताच्या आधारे राबविली आहे.
याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे यांनी वेळोवेळी तक्रार दिल्यामुळे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी शिरोळे विरोधात खोटा अर्ज तयार करून शिरोळे यांची नाहक बदनामी केली असल्यामुळे चिखली गावचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी जातीय द्वेषातून बनावट खोटे दस्त बनवणार्याना व त्यांना सहकार्य करणार्या अधिकारी यांच्यावर योग्यती चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावेत अशी मागणी वंचित बहूजन आघाडी पाटोदा तालुका महासचिव तथा चिखली येथील तत्कालीन चे ग्रामपंचायत सदस्य राहुल शिरोळे यांनी केली आहे. चिखली ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव खोटा असल्या बाबत तसेच शिरोळे यांच्या विरोधात बनवलेल्या खोटा अर्ज असल्याचे चिखली ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या अर्जात म्हणणे मांडले असताना देखील पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाणीव पूर्वक माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहेत या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून मुजोरपणा करणार्या पाटोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह भ्रष्टाचारात सामील असलेल्या माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकावर तात्काळ गुन्हे दाखल करावा नसता लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पाटोदा तालुका महासचिव राहुल शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे
COMMENTS