Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात पार पडला तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाचा लोकार्पण सोहळा 

तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकामी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल - जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक - जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे आज दिनांक २५ /०४/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाचा लोकार्पण सोहळा मोठया उत्सहात

प्रधानमंत्री मोदींच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्त कोण-कोणते कार्यक्रम होणार?
1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी : शेखर सिंह
कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

नाशिक – जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे आज दिनांक २५ /०४/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाचा लोकार्पण सोहळा मोठया उत्सहात पार पडला. या कार्याक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मा. जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल, आरोग्य विभागचे उपसंचालक डॉ. कपील आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, तसेच तृतीय पंथी समाज नाशिक च्या गुरु सलमा शिखा, व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तृतीयपंथींयापर्यंत पोहचविणेकामी जिल्हा प्रशासन प्रयत्नशिल असल्याचे नमुद केले. तसेच आगमी सार्वजनिक लोकसभा निवडनुकीत सर्वांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य बजविण्यासाठी अग्रही भुमिका मांडली. तृतीयपंथींयांसाठी आरोग्य सुविधा पुरविणेबाबत ब-याच काळापासुन प्रलंबित मागणी पुर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थितींचे स्वागत केले व राज्यात सर्व प्रथम तृतीयपंथीयांसाठी आरक्षीत कक्ष जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे सुरु झाल्याचे नमुद केले. या कक्षात अद्ययावत अशा १० खाटा असुन जीव रक्षक प्रणाली आवश्यक यंत्रे व उपकरणे इत्यादी कक्ष सुसज्ज आहे. येथे दाखल होणा-या सर्व रुग्णांवर मोफत निदान, विनामुल्य शस्त्रक्रिया व रक्त तपासण्या व उपचार करण्यात येणार आहेत. उपरोक्त कक्षासाठी सहा प्रकारच्या विशेषज्ञ सुविधा व परिचार्या सेवा नियोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांसाठी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आरोग्य विषयक सेवा व सुविधा देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन डॉ. अनंत पवार यांनी केले व कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील, डॉ. प्रविण बोरा, अधिसेविका श्रीमती भालेराव व श्रीमती वाघ आणि जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, अधिपरीचारीका यांनी प्रयत्न केले.

तृतीयपंथीयांसाठी राखीव कक्षाची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवून शासकीय आरोग्य संस्थांमध्ये त्यांनी उपचार घ्यावेत व आजारपणाजासाठी खाजगी रुग्णालयात येणारा अतिरीक्त खर्च टाळावा असे आवाहन लोकार्पण प्रसंगी श्रीमती अशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी केले. जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

COMMENTS