महागाईचा तडका ; टोमॅटोने ओलांडली शंभरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईचा तडका ; टोमॅटोने ओलांडली शंभरी

मुंबई : इंधन, खाद्यतेल, जीवनावश्यक अन्नधान्यांच्या वस्तूंच्या किंमती मोठया प्रमाणावर वाढत असतांना, मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात भाजीपाल्याचे भाव द

मखमलाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर शासन करा
हिंडेनबर्ग अहवालावरून संसदेत गदारोळ

मुंबई : इंधन, खाद्यतेल, जीवनावश्यक अन्नधान्यांच्या वस्तूंच्या किंमती मोठया प्रमाणावर वाढत असतांना, मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात भाजीपाल्याचे भाव देखील कडाडल्याचे चित्र आहे. टॉमटोने बाजारात शंभरी ओलांडल्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
सततची उष्णतेची लाट आणि अवकाळी उष्णतेमुळे टोमॅटो व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक आंब्याचे उत्पादन करणार्‍या कोकणामध्ये 80 टक्के उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी पुरवठ्यामुळे आंबा आणि टोमॅटोच्या दरात मोठी उसळी आली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये किरकोळ विक्रीमध्ये टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन कोकणात होते. पण यावेळी उत्पादन दोन दशकांतील सर्वात कमी राहण्याची अपेक्षा आहे. उष्णतेच्या लाटेमुळे 80 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा भाव 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाडवे म्हणाले की, टोमॅटोचे भाव अलीकडच्या काळात कमी होण्याची अपेक्षा नाही. नवीन पीक आल्यावर जुलैमध्ये काही प्रमाणात नरमाई येऊ शकते.
देशात टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे घरोघरी वापरला जात असल्याने सरकारच्या अडचणी वाढू शकतात. अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर 8.38 टक्क्यांवर पोहोचला, जो 17 महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे महागाई वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे टोमॅटो पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे गडवे यांनी सांगितले. त्यामुळे पुरवठ्यात लक्षणीय घट झाली आहे.

COMMENTS