Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये दाम्पत्याने आपल्या मुलीसह संपवले जीवन

इंदिरानगर  - इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथील एका घरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. यामागी

सत्यजित तांबेंना उमेदवारी न देणे ही आमची चूक – अजित पवार
छत्तीसगडमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
शेतमजुराची मुलगी झाली वनरक्षक

इंदिरानगर  – इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथील एका घरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. यामागील निश्चित कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले आहे. आई-वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी जीवन संपवले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मयत हे कंपनी कामगार होते. विजय माणिकराव सहाणे (वय ४०) त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने (वय ३६)आणि मुलगी अनन्या विजय सहाने (वय 9) असे जीवन संपविलेल्या तिघांची नावे आहेत. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहे

COMMENTS