Homeताज्या बातम्यादेश

नव्या संसद भवनाचा वाद सर्वोच्च दारी

सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहेत. मात्र या उद्घाटनाला विरोधकांनी आक्षेप घेत

वाकडेवाडी परिसरात उलटला मेट्रोचा कंटेनर
ऐन सणासुदीत साखर महागणार
लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद् घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी करणार आहेत. मात्र या उद्घाटनाला विरोधकांनी आक्षेप घेतला असून, या इमारतीचे उद्धाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी विरोधकांनी केली असून, 19 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून, हा वाद आता गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, याप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
सीआर जया सुकीन यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याकरता लोकसभा सचिवालयाला दिशा, निरीक्षण किंवा सूचना देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. 28 मे रोजी लोकसभेच्या महासचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नव्या संसदेचे उद्घाटन करणार असल्याचे जाहीर केले आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना आमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याने याचिकेत संविधानाच्या अनुच्छेद 79 चा संदर्भ दिला आहे. राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रथम नागरिक असतात. त्यांना संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा किंवा स्थगित करण्याचा अधिकार असतो, असे याचिकार्त्याने निदर्शनास आणून दिले आहे. पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करत असतात. सर्व औपचारिक कार्य राष्ट्रपतींच्या नावाने केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींना समारंभासाठी निमंत्रित न करणे हा अवमान असून संविधानाचे उल्लंघन आहे, असा युक्तीवाद करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी जापान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौर्‍यावरून दिल्लीतील विमानतळावर पोहचले. भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अन्य नेत्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिडनीतील एक दाखला देत विरोधी पक्षाला लक्ष्य केले.  सिडनीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला 20 हजार लोक उपस्थित होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीस, माजी पंतप्रधान आणि पूर्ण विरोधी पक्ष आपल्या देशासाठी एकत्र आला होता, असे सांगत मोदींनी बहिष्कार टाकणार्‍या विरोधी पक्षावर अप्रत्यक्षपणे टीका केली. संसदेची उभारणी अहंकाराच्या विटांनी नव्हे, तर घटनात्मक मुल्यांनी होते. नव्या संसंद भवनाच्या उद्घटनाचे निमंत्रण राष्ट्रपतींना न देण्याची भूमिका हा त्यांचा अवमान आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हटले.

COMMENTS