कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल तर्फे डॉ कुणाल घायतडकर व डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर या दाम्पत्यानी
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील प्रसिद्ध डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल तर्फे डॉ कुणाल घायतडकर व डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर या दाम्पत्यानी महिनाभर मोफत दंत रोग तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरात हजारो महिला पुरुष व लहान बालकांनी सहभाग नोंदवत आपल्या दातांची अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत तपासणी करून उपचार घेतले.
डॉ कुणाल घायतडकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतातच परंतु त्यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसाया सोबतच मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित केल्यामुळे त्यांचा अनेकांना फायदा झाला असल्याने डॉक्टर घायतडकर दाम्पत्याचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या शिबिरांच्या सांगते प्रसंगी बोलताना व्यक्त करत डॉक्टर घायतडकर दाम्पत्याचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. डॉक्टर घायतडकर दाम्पत्यभे दरवर्षी आपल्या हॉस्पिटल द्वारे महिनाभर मोफत दंत रोग तपासणी शिबिर आयोजित करत असते याही वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे शिबिर आयोजित केले होते या शिबिरात महिनाभरात 3 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवत आपल्या दातांची तपासणी करून घेतली. तसेच आजकालच्या वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेकांना तोंडाच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन वर्षांनी उद्भवणार्या तोंडाच्या समस्या आजच जगातील सर्वात प्रगत असे तंत्रज्ञान असलेल्या वेल स्कॅन व डीएनए स्कॅन या मशीन द्वारे तोंडाची तपासणी करून समजते हे तपासणी शिबिर देखील एक दिवसीय मोफत राबविले होते यात देखील 100 पेक्षा अधिक रुग्णांनी सहभाग नोंदवत आपल्या तोंडाची जगातील प्रगत तंत्रज्ञान असणार्या मशीन द्वारे तपासणी करून घेतली. याच शिबिराची सांगता कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या प्रसंगी सुषमा देसले, शोभाताई घायतडकर , सोमनाथ डफाळ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे यांनी बोलताना सांगितले की, डॉ घायतडकर यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातद्वारे जे सामाजिक दायित्व जपले आहे ती एक गौरवस्पद बाब असून त्यांच्या या शिबिरामुळे तळागाळातील गोरगरिबांना नक्कीच लाभ झाला असल्याचे धावपटू आथरे यांनी सांगत डॉ घायतडकर दाम्पत्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलच्या फार्मासिस्ट अबोली वाणी, जास्मिन शेख,शुभांगी चव्हाण आदी कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टर घायतडकर यांच्या या सामाजिक सेवेचे सर्व स्तरातून कौतुक
COMMENTS