Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील

राजारामनगर : चातक इनोव्हेशन्सच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नवीन ड्रोनच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिक पाटील, नेताजीराव पाटील, सुभाषराव जमदाडे, सुधाकर भोस

सातारा जिल्ह्यातील संस्था मोडीत काढणारे जिल्हा बँकेत नको : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
 कापसाचे दर वाढवण्यात यावे; शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी
नांदगाव सोयाबीनची गंजी जळून खाक | Nifad | Maharashtra News (Video)

इस्लामपूर / प्रतिनिधी : चातक इनोव्हेशन्सने एका वर्षात भारतीय बनावटीचे 2 ड्रोन बनवून मोठे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. ज्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या दारात ट्रॅक्टर आला आणि शेतीस मोठी गती मिळाली,त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या शेतात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार आहे, असा विश्‍वास प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला. आपण देशात सर्वप्रथम 7 हजार 300 एकर क्षेत्रावर ड्रोनने फवारणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामनगर येथील गायत्री हॉलमध्ये चातक इनोव्हेशन्सच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रगतशील शेतकरी, माजी उपसभापती नेताजीराव पाटील, चातक इनोव्हेशन्सचे कार्यकारी संचालक सुभाषराव जमदाडे, सुधाकर भोसले, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी प्रतिक पाटील यांच्या हस्ते नवीन ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले.
आपण आतापर्यंत 5 ड्रोनच्या माध्यमातून 7 हजार 300 एकर क्षेत्रावर फवारणी केली आहे. यातील काही क्षेत्र क्रांती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आहे. आपण भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे ड्रोन निर्मिती व वापर यावर काम करत असल्याचे चातक इनोव्हेन्शनचे कार्यकारी संचालक सुभाषराव जमदाडे यांनी बोलताना स्पष्ट केले.
शेतकर्‍यांना ड्रोनने फवारणी करायची आहे. अशांनी कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये नांवे नोंद करावीत. एकरी 600 प्रमाणे आम्ही आपल्या शेतात फवारणी करत असल्याचे ऊस विकास अधिकारी सुजय पाटील यांनी उपस्थितांना सांगितले.
पहिला ड्रोन खरेदी केलेले बहेचे शेतकरी अमर देशमुख म्हणाले, आम्ही 8 महिन्यात 1700 एकर फवारणी केली आहे. याप्रसंगी माजी उपसभापती नेताजीराव पाटील, शेतकरी सुदर्शन पाटील, अदित्य जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. चातक इनोव्हेशनचे मुकुल तिवारी, बाजीराव नांगरे-पाटील यांनी ड्रोन व त्याच्या उपयोगाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी क्रांतीचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव, संग्राम पाटील, महेश कदम, अभिजित कुंभार, अजित जाधव, रोहित साळुंखे, अवधुत झरे, नंदकुमार मेमाने, संदीप बारपटे, वैभव कणसे, जयकर मुळीक, अजय पाटील, हर्षल पाटील, संजय पडळकर, रमेश गायकवाड, अनिल पाटील, लोकेश पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. अवधूत पाटील यांनी सूत्रसंचलन केले. चातक इनोव्हेशनचे संजीव धानोरकर यांनी आभार मानले.

COMMENTS