Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठेकेदाराने दिली मजुरांना दिवाळीची परस्पर सुट्टी..

नगर-मनमाड रस्त्याची दुरावस्था कायम, पोलिस मात्र रस्ता अडवून उभे

अहमदनगर प्रतिनिधी - नुसत्या नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वदेशात दुरावस्थेमुळे प्रसिद्ध झालेल्या नगर-मनमाड महामार्गाचे नष्टचर्य संपायची चिन्हे

शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढणार ः दिनभर टापरे
BREAKING: रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक संतप्त | Lok News24
पुणतांबा रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिनी रेल रोको आंदोलन

अहमदनगर प्रतिनिधी – नुसत्या नगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वदेशात दुरावस्थेमुळे प्रसिद्ध झालेल्या नगर-मनमाड महामार्गाचे नष्टचर्य संपायची चिन्हे नाहीत. या रस्त्याची वाहतूक 15 दिवसांसाठी बंद करून दुरुस्ती काम सुरू केले गेले. पण हे काम करणार्‍या ठेकेदाराने कामावरील मजुरांना दिवाळीची पाचदिवस सुट्टी परस्पर दिली, ते पाहून या कामावर देखरेख करणारे सार्वजनिक बांधकामविभागाचे अधिकारीही दिवाळी साजरी करायला निघून गेले. पण बिचारे वाहतूक पोलिस अजूनही तेथे तंबू ठोकून आहेत व अर्धवट दुरुस्ती झालेल्या रस्त्यावरून अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून वाहनचालकांना पर्यायी रस्त्याने जाण्यास सांगत आहेत.त्यामुळे या पोलिसांची यंदाची दिवाळी याच तंबूच्या परिसरात होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या सांगण्यावरूनच ठेकेदारानेमजुरांचा दिवाळीची सुट्टी दिल्याचे सांगितले जात आहे.

नगर-मनमाड महामार्गाने अनेकजण रोज जा-ये करतात.त्यांच्या छोट्या वाहनांना जाण्यास अडचण नाही. दुरुस्ती कामामुळे यारस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक 15 दिवसांसाठी बंद केली गेली आहे. मोठ्या वाहनांची वाहतूक नसल्याने रस्ता दुरुस्तीचे काम जोरात सुरू होते. प्रचंडमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे. तसेच खड्ड्यांमधून अवजड वाहनांना अपघात होऊ नये म्हणून संथ गतीत तोल सावरतजावे लागत असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायमची होती. या रस्त्याच्या दुरवस्थेची खूपच ओरड सुरू झाल्याने अखेर या रस्त्याची अवजड वाहतूक 15 दिवसांपर्यंत बंद करून खड्डे दुरुस्ती मोहीम हाती घेतली, पण मागील दोनदिवसांपासून अचानक ते काम बंद पडले आहे व हे दुरुस्ती काम करणारे मजूरहीगायब झाले आहेत. या दुरुस्ती कामावर लक्ष ठेवून असलेले सार्वजनिक बांधकामविभागाचे अधिकारी व त्यांच्या गाड्याही दिसत नाहीत. पोलिस मात्र तेवढेईमानेइतबारे वाहतूक अडवण्याचे काम निष्ठेने करताना अनेकांना दिसले आहे.त्यांनी ही वस्तुस्थिती सोशल मिडियावर व्हायरल केल्याने ती चर्चेची झाली आहे.

सोशल मिडियावर टीका – नगर-मनमाड महामार्गावर विळद परिसरात राहणारे शेतकरीबलभीम पठारे हे रोज या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. काम अचानक बंद झाल्याने व त्यामागचे कारण समजल्याने त्यांनी सोशल मिडियावर यावर भाष्य केले. काम सुरू झाल्यापासून बंद पडेपर्यंतचा इतिहास त्यांनी मांडल्यानेसोशल मिडियावर त्यांना यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी कारभार, रस्ता बंद व काम सुद्धा बंद,असंख्य लोकांनी आंदोलन करून व विनंती करून एकदाचे नगर-मनमाड रोडचेखड्डे बुजवण्याचे काम दिनांक 15 पासून रस्ता बंद करून चालू झाले. पण, प्रत्यक्षातकाम चालू व्हायला दोन दिवस गेले. दिनांक 17 तारखेपासून विळदच्या पुढे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. 21 तारखेपर्यंत काम सुरळीत चालू होते. यामध्ये फक्त ठेकेदाराचे कामगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी किंवा इंजिनिअरकाम करीत नव्हते तर पोलिस विभाग सुद्धा दिवस-रात्र विळदच्या चौकात पावसात व उन्हात उभे राहून रस्ता अडवून उभे होते. त्यामुळेच ठेकेदाराच्या मजुरांना खड्डे बुजवण्याचे काम सुरळीतपणे करता येत होते. पण पाच दिवस दिवसभर एसी गाडी ऑनकरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनिअर कामावर लक्ष ठेवून कंटाळले हो ते. समोर दिवाळी आहे याचा विचार करून त्यांनी पाच दिवस मजुरांना,ठेकेदारांना काम थांबवायला सांगितलं. जा पाच दिवस दिवाळी करा, सणसुद करा,मग आपण पुन्हा काम चालू करू.. आम्ही आता तुम्हाला काम करताना पाहून कंटाळलो आहोत…आम्हालाही सणसुद आहे. परिणामी, पडत्या फळाची आज्ञामानून सारेच गायब झाले, असे सोशल मिडियावर फिरत असलेल्या यासंदर्भातील त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.यात पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहता दिवाळीची पाच दिवस सुट्टी कुठल्याच सरकारी विभागाला नाही. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा फक्त दोन किंवा तीन दिवसाची सुट्टी दिली आहे, पण वर्षभर वरोज दिवसभर खड्डे मोजून व त्या अनुषंगाने येणारे असंख्य प्रकार मोजून बांधकाम विभागाचे अभियंता थकले असावेत. कामगारांनी व ठेकेदारांनी सुट्टीमागितलेली नसताना सुद्धा पाच दिवस काम बंद ठेवण्याचा अभिमानास्पद प्रकार सार्वजनिकबांधकाम विभागाने केला. दिवसभर ऑफिसमध्ये पंख्याखाली बसून किंवा एनएचएआयबोर्ड लावलेली एसी गाडी ऑन करून सुपरवाईझ करणारे इंजिनियर यांनाच फक्त दिवाळी आहे का?, असा उद्विग्न सवालही या सोशल मिडिया पोस्टमध्ये आहे वतो चर्चेतही आहे.

पोलिसांना सणसुद नाही का? – कोविड काळात, गणेशोत्सव दरम्यान, मोहरम काळात, कुठलाही मंत्री आला, कुठलीही दंगल झाली तरी बिचार्‍या पोलिसांना कामकरावंच लागतं. मुकी बिचारी कोणीही हाका अशी परिस्थिती पोलिस विभागाची झाली आहे. नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्यावर व या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद केल्यावर या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी चक्क तंबू ठोकून पोलिस थांबले आहेत. दिवस रात्र, ऊन-पावसात उभे राहून व रस्ते अडवून न ऐकणार्‍या उद्दामवाहनधारकांना विनंती करून रस्त्यावर उभे राहणार्‍या पोलिसांना कोणीच वाली नाही का? त्यांना सणसुद व घरदार काहीच नाही का?, असा सवालही शेतकरी बलभीम पठारे यांच्या सोशल मिडिया पोस्टवर असून, त्यालाही प्रतिसाद जोरदार आहे.

COMMENTS