Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यम्बक नाशिक वारी मार्गाची अवस्था काही वेगळी 

नाशिक प्रतिनिधी - पंढरपूर पायी वारीसाठी संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या पालखीचे २० जूनपासून प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थानासाठी अवघे आठ दि

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचा राजीनामा
भातकुडगाव फाट्यावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार

नाशिक प्रतिनिधी – पंढरपूर पायी वारीसाठी संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानच्या पालखीचे २० जूनपासून प्रस्थान होणार आहे. पालखी प्रस्थानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असताना त्र्यंबक-नाशिक महामार्गाची अवस्था बिकट आहे. या मार्गालगत दिंडी मार्ग तयार करावा, अशी अनेक दिवसांची वारकऱ्यांची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

या रस्त्याने ज्येष्ठ महिन्यात पंढरपूरला पालखी जाते. श्रावण महिन्यात रामवारी, हरिहर भेट, नवरात्रौत्सवात सप्तशृंग गडावर जाणारे कावड धारक, पौष महिन्यात लाखो वारकरी संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी पायी दिंडीने येतात. दरमहिन्याच्या एकादशीला पायी येणारे वारकरीही आहेत. सोबत वर्षभर शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांचा या मार्गावरून राबता असतो. मात्र, शासनाने या • रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्षच केले आहे.

सन २०१४ मध्ये सिंहस्थ नियोजनात नाशिक-त्र्याबक रस्ता चारपदरी करण्य्यात आला. तत्कालीन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी चारपदरी रस्ता सायकल ट्रक आणि पायी दिंडी मार्ग असलेला देशातील पहिल्या हरित मार्गाची घोषणा केली. मात्र, हे प्रत्यक्षात साकार झाले नाही.

पालखी प्रस्थानापूर्वी किमान रस्त्याच्या बाजूला असलेली काटेरी झुडपांची छाटणी करणे, साइड पट्ट्यांची डागडुजी व स्वच्छता करणे, रस्त्यावर असलेले खड्डे बुजवणे, मांस- मच्छी विक्रेत्यांनी जागोजागी फेकलेले कोबंड्यांचे अवशेष, पिसे यामुळे दुर्गंधी – निर्माण झाली असून, त्यासाठी स्वच्छता होणे गरजेचे आहे.

COMMENTS