Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलितांवरील अत्याचारांविरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक

  धुळे प्रतिनिधी - देशात दलितांवर अत्याचार वाढले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया

कोपरगावच्या रस्ते नुतनीकरणासाठी 80 लाखाच्या निविदा प्रसिद्ध ः आमदार काळे
बाप लेकाचा तलावात बुडून मृत्यू | LOK News 24
शास्त्रीजींनी १९६५ च्या भारत पाक युध्दात भारताला विजय मिळवून दिला – आ. डॉ. सुधीर तांबे

  धुळे प्रतिनिधी – देशात दलितांवर अत्याचार वाढले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. याविषयी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुजरातमध्ये दलित तरुणाला गोरक्षकांनी मारहाण केली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथेही अशीच घटना घडली. तसेच समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. अर्थसंकल्पात अनेक योजनांना कात्री लावली आहे. मागासवर्गीयांना सर्व सुविधांपासून वंचित ठेवले जाते आहे. केंद्र सरकार आरक्षण संपवते आहे, असे अनेक आरोप दलित अधिकार समिती करत आहे.

दलित समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, कंत्राटीकरण रद्द करून सफाई कामगारांना कायम करावे, असंघटित कामगारांना किमान वेतन व अन्य कायदेशीर सुविधा द्याव्या, किमान वेतन न देणाऱ्यांवर कारवाई करावी, खासगीकरण केलेल्या क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती वर्गाला आरक्षण द्यावे, झोपडपट्टीधारकांचे त्याच जागेवर पुनर्वसन करावे, स्थलांतर कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन झाले. आंदोलनात हिरालाल परदेशी, वसंत पाटील, हिरालाल सापे, पोपट चौधरी, नाना अहिरे, ॲड मदन परदेशी, हिरालाल वाणी, शंकर पाटील, हरिचंद्र लोंढे, मनोहर पाटील, मनोहर निंबाळकर, अरविंद पाटील, किशोर सूर्यवंशी, रामचंद पावरा, सतिलाल पावरा, ॲड. संतोष पाटील, अशोक पाटील, अर्जुन कोळी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

COMMENTS