Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच अनंतकुमार घुले यांचा स्तुत्यउपक्रम !

गावातील नागरिकांनसाठी स्वखर्चाने ऑब्युलन्सचे लोकअर्पण

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील माजी उपसभापती नारायण बप्पा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी गावचे लोकप्रिय सरंपंच अनंतकुमार घुले सर यांनी आपल्य

आम्ही ओबीसी उमेदवार देणार…तुम्ही?
नांदेड येथे शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर – पालकमंत्री अशोक चव्हाण
एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टम कोर्सेसचा संयुक्त पासिंग आउट परेड

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील माजी उपसभापती नारायण बप्पा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी गावचे लोकप्रिय सरंपंच अनंतकुमार घुले सर यांनी आपल्या गावाला मोफत स्वखर्चाने ऑब्युलन्स सेवा उपलब्ध करुन दिली आहे.टाकळी गावाला आजपर्यंत अनेक सरपंच होऊन गेले परंतु आज पर्यंत एकाही सरपंचांनी असा स्तुत्य उपक्रम राबविला नाही तो उपक्रम माजी उपसभापती नारायण बप्पा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी गावचे लोकप्रिय सरपंच अनंतकुमार घुले यांनी आज केज येथे राबिवीला आहे.असे उपक्रम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवीले तर आपल्या गावातील नागरिक नक्कीच आशा सरपंचांना शेवटच्या क्षणा पर्यंत विसरनार नाही.तरी या ऑब्युलन्सचे लोकअर्पण आज दीनांक 28ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब व येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित माजी उपसभापती नारायण बप्पा घुले,टाकळी गावचे लोकप्रिय सरपंच अनंतकुमार घुले,टाकळी गावातील नागरिक ,टाकळी गावचे सेवा सोसायटी चेअरमन श्रीकांत घुले व कृषी मंत्री धनंजय मुंडे व येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांचे केज तालुक्यातील कार्यकर्त्ये , नेते मंडळी नागरिक यावेळी उपस्थित होते यांच्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये टाकळी गावचे लोकप्रिय सरपंच अनंतकुमार घुले यांनी आपल्या टाकळी गावातील नागरिकांनसाठी स्वखर्चाने ऑब्युलन्सचे लोकअर्पण केले

COMMENTS