Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याधिकार्‍यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा ः प्रांतधिकारी प्रसाद मते

पाथर्डी ः पाथर्डी शहराला अनियमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी नळ पाणीपुरवठा योजनेवर जातीने लक्ष

आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश
पंतप्रधान नरेंद्र मोदीना दाढी कटींग करण्यासाठी चहा विक्रेत्याने पाठवली १०० रूपयांची मनिआँडर l पहा
उद्याच्या महाराष्ट्रासाठी समाजसुधारकांची फळी निर्माण होणे आवश्यक : आमदार आशिष शेलार

पाथर्डी ः पाथर्डी शहराला अनियमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी नळ पाणीपुरवठा योजनेवर जातीने लक्ष देत शहरातील पाणीपुरवठा संबंधी अडचण दूर करावी असा सूचना प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी संतोष लांडगे यांना दिल्या.शुक्रवारी या संदर्भात शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात याआला होता त्या अनुषंगाने ही बैठक आज  प्रांताधिकारी  मते यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी नगरपरिषदेमध्ये संपन्न झाली. यावेळी तहसीलदार उद्धव नाईक, मुख्याधिकारी संतोष लांडगे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता आनंद रुपनर, प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, अँड.दिनकर पालवे,किसन आव्हाड, माणिक खेडकर, नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, सुरेश हुलजुते, संजय शिरसाठ,राहुल देशमुख, विकास नागरगोजे,कृष्णा पांचाळ आदी उपस्थित होते.

यावेळी घोडके म्हणाले की, पाथर्डी शहराला मिळणारा पाण्याचा पुरवठा हा पूर्ण क्षमतेने का होत नाही,शहराचे पाणी इतरत्र वळवल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाय योजना कराव्यात,जायकवाडी धरणातून येणारे पाणी हे पाथर्डी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागासाठी येते, यासाठी वेळ ठरवून दिलेले आहे त्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला की ठरवून दिलेल्या वेळेतील पाणी मिळत नाही त्याचा परिणाम शहराला कमी पाणी पुरवठा होतो.त्यामुळे वीज खंडित होणार नाही यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. यावेळी मुख्याधिकारी लांडगे व पुरवठा विभागाचे कर्मचारी म्हणाले की, शहराला किमान 35 लाख लिटर पाण्याची मागणी आहे.मात्र तेवढे पाणी मिळत नाही.वीजपुरवठा सुरळीत असेल तर बावीस ते तेवीस लाख लिटर पाणी जायकवाडी धरणातून शहराला मिळत असून शहराच्या मागणी पेक्षाही कमी पाणी मिळत असल्याने शहराला नगरपरिषेकडून सुस्थितीत पाणीपुरवठा करता येत नाही. पाणी पुरवठ्याचे उपअभियंते रुपनर म्हणाले, पाथर्डी शहराला जायकवाडी धरणातील ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो त्या चरात व परिसरात कमी पाणी झाल्याने पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी आता पाणी कमी पडत असून पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी साठा त्या परिसरात आहे.

पाणी कमी पडून नये म्हणुन जिल्हा परिषदे मार्फत उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. यावेळी शहराला गढूळ व काही भागात महिला मिश्रित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी या बैठकीत मुख्याधिकार्‍यांना चांगले धारेवर धरत, गढुळ पाण्याची बॉटल प्रांत अधिकार्‍यांना दाखवून ती त्यांच्या टेबल समोर मांडत नागरिकांना तुम्ही असे पाणी प्यायला देणार का असा सवाल विचारला. नगरपालिका भरमसात पाणीपट्टी घेते, मात्र शुद्ध पाणी लोकांना प्यायला देत नाही, शुद्ध तर जाऊ द्या पिण्यायोग्य सुद्धा पाणी सध्या मिळत नाही.नागरी समस्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले असल्याचा म्हणणे मांडत मुख्याधिकार्‍यांवर रोष व्यक्त केला.अँड दिनकर पालवे,किसन आव्हाड,नागनाथ गर्जे, सुनिल पाखरे, सुरेश हुलजुते, विकास नागरगोजे यांच्यासह नागरिकांनी या बैठकीदरम्यान चर्चेत सहभाग घेतला.

COMMENTS