Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामठा येथे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी

नांदेड । प्रतिनिधीअर्धापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव अंतर्गत येणार्‍या आरोग्य उपकेंद्र कामठा (बु.) येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आ

शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
पोलिसांचे संचलन देऊन गेले चर्चांना उधाण ; अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेच्यादृष्टीने पोलिसांची लेफ्ट-राईट
फी भरण्याच्या निर्णयाची 2017 पासून अंमलबजावणी

नांदेड । प्रतिनिधी
अर्धापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव अंतर्गत येणार्‍या आरोग्य उपकेंद्र कामठा (बु.) येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम सावंत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. डाढाळे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. कोळेकर तसेच विस्तार अधिकारी डॉ. एस. पी. गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना कर्करोगाविषयी सविस्तर माहिती देत वेळेवर तपासणी केल्यास आजारावर प्रभावी उपचार शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीकांत देसाई यांनी केले. कामठा येथे झालेल्या या कर्करोग तपासणी शिबिरात एकूण 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 90 जणांची मुख कर्करोग तपासणी, 39 महिलांची स्तन कर्करोग तपासणी तसेच 24 महिलांची गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संशयित आढळलेल्या एकूण 13 रुग्णांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत संदर्भित करण्यात आले आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहायक अरुण गादगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. लिना बनसोडे, बी.सी.एम. फेरोज शेख, एजाज शेख, उपकेंद्रातील ए.एन.एम. भाले व खुळे सिस्टर, एम.पी.डब्ल्यू. मांजरमकर, उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, आशाताई तसेच अंगणवाडी सेविकांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS